EKANATH SHINDE UPSET AGAIN saam tv
महाराष्ट्र

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Eknath Shinde Skips Devendra Fadnavis' Drought Meeting: महायुतीत पुन्हा एकदा समन्वयाचा दुष्काळ पाहायला मिळालाय...आणि त्याला कारण ठरलयं...उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाराजी....मात्र शिंदे नेमके कुणावर आणि का नाराज झालेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

राज्यात एकीकडे दुष्काळानं शेतकरी होरपळून निघालेला असताना महायुतीतच समन्वयाचा दुष्काळ पाहायला मिळालाय... महायुतीतील अंतर्गत वादामुळे नाराज होत दरे गावी निघून जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा रंगलीय..आणि त्याला कारण ठरलयं...गेल्या काही दिवसांत घडलेल्या महत्त्वाच्या घटना....

पुणे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीसाठी शिंदेंचे OSD मंगेश चिवटे इच्छुक होते. मात्र भाजपनं स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे...

तर राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षावर बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे निमंत्रण नसल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

त्यानंतर महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बैठक बोलावलेली असताना बैठकीला न जाता शिंदेंनी त्याचवेळी ‘नंदनवन’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.

त्यामुळे महायुतीत नाराजीनाट्य सुरू असल्याची जोरदरा चर्चा आहे... एकनाथ शिंदेंनी याबाबत भाजप हायकमांडची भेट घेत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...मात्र शिंदे नाराज असते तर चिवटेंनी उमेदवारी मागे घेतली नसती, असं म्हणत प्रवीण दरेकरांनी मर्मावर बोटं ठेवलयं... तर स्वत: एकनाथ शिंदेंनीही नाराज नसल्याचं स्पष्ट केलंय.

याआधीही 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील जागावाटप असू द्या किंवा मुख्यमंत्री पदाची दावेदारी शिंदेंची नाराजी कधीच लपलेली नाही...मात्र

शिंदेंनी आपली नाराजी वेळोवेळी दिल्लीतल्या हायकमांडसमोर मांडण्यासाठी

मागे पुढे पाहिले नाही. आता पुन्हा ऐन दुष्काळात नाराजी नाट्य सुरू असल्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याची चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

नाशिककरांच्या पाण्यात कॅन्सरचं केमिकल? 10 कंपन्यांना टाळं, इतर कंपन्यांचं काय?

SCROLL FOR NEXT