Sunetra Pawar Eknath Shinde saam tv
महाराष्ट्र

Sunetra Pawar : जनाची तरी लाज बाळगा; सुनेत्रा पवारांवर टिप्पणी करणाऱ्या काँग्रेसवर शिंदे कडाडले

eknath shinde attacks congress over sunetra pawar remark : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीप्पणी करणाऱ्या काँग्रेसवर मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही संताप व्यक्त केला आहे.

Nandkumar Joshi

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या 'गुंगी गुडिया' या टिप्पणीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक शब्दांत समाचार घेतला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींचा आणि लाडक्या बहिणींचा अपमान आहे. काँग्रेसने निदान जनाची तरी बाळगायला हवी होती, असा घणाघात शिंदे यांनी केला.

महिलांच्या सन्मानाच्या नावाने राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा आज खरा चेहरा महाराष्ट्राने पाहिला आहे. राजकीय विरोध करा, पण महिलांचा अपमान करून राजकारण करण्याची ही काँग्रेसची संस्कृती आहे का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिंदे म्हणाले, सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करण्याच्या नादात काँग्रेसने संपूर्ण महिला शक्तीचाच अवमान केला आहे. हा अपमान महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला कधीही विसरणार नाहीत. महिलांचा सन्मान करणाऱ्या महाराष्ट्रात अशा प्रकारची भाषा कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही.

यावेळी त्यांनी 'लाडकी बहीण' योजनेचाही उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला. २०२४ मध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी काँग्रेसला लोकशाही मार्गाने उत्तर दिले होते. महिलांचा अपमान करणाऱ्यांना पुन्हा एकदा जनताच धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला.

काँग्रेसने राजकीय विरोध करताना सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. महिलांचा अपमान करणारी भाषा महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही, असं सांगतानाच शिंदे यांनी काँग्रेसवर चौफेर टीका केली.

मुख्यमंत्र्यांनीही सुनावले खडेबोल

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरलं असून बातमीत येण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंबोली महादेवगड येथील खोल दरीत पर्यटक कोसळला

Curry Leaves Benefits : केसगळती ते डायबेटिस...रोज कढीपत्ता खाल्ल्यानं होतील ६ जबरदस्त फायदे, वाचा

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत मोठी घडामोड! शरद पवार पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त

Crime: ३२ सेकंदात ३४ वेळा चाकूने वार, शिक्षिकेची शाळेबाहेर हत्या; थरकाप उडवणारा VIDEO समोर

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत वाढवली, या तारखेपर्यंत नोंदणी करता येणार

SCROLL FOR NEXT