Eknath Shinde Shiv Sena political joining Maharashtra : राज्यभरातील विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतल्याने पक्षाच्या संघटनविस्ताराला मोठे बळ मिळाले आहे. उबाठा गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष तसेच बहुजन हक्क अभियानाशी संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. १८) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नंदनवन या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुढाकाराने बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुजाता डोळसे, उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह १३ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांतील सुमारे २०० कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये धायटीचे सरपंच पतथा पुरोगामी, तालुका अध्यक्ष रवीभाऊ मेटकरी, जिल्हा परिषद सभापती बंडू मोटे, मनोज ढोबळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
बार्शीतील उबाठा गटाचे माजी उपशहरप्रमुख दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन हक्क अभियानाचे बार्शी तालुकाध्यक्ष सचिन पालखे, श्रीकांत गायकवाड, दर्शन देशमुख, महिला अध्यक्ष बबिता मोकाशी यांच्यासह अनेक पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले.
चंद्रपूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पांडुरंग जाधव, जिवती नगर परिषदेचे नगरसेवक मारुती भुमरे यांच्यासह अनेक सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातही शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला बळ मिळाले आहे.
आमदार नीलेश राणे यांच्या पुढाकाराने मुंबईतील मनसेचे माजी सरचिटणीस संतान फर्नांडिस, विभाग अध्यक्ष अमृत जावळे, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर मनीष अडविलकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या महिला बॉडीबिल्डर दीपा सप्रे यांच्यासह मनसे विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मर्चंट नेव्ही क्षेत्रातील रविंद्र बाईंग, सुरेश साळसकर, नंदकुमार बाईंग, मिहिर पुरोहित यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा भगवा स्वीकारला.
ईशान्य मुंबईतील सोशल मीडिया उपाध्यक्ष राज गोळे, हेमंत दळवी, सुनील मेढेकर, सोनाली सोळंकी, दीपक बोर्डे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शिवशाही केबल आणि इंटरनेट असोसिएशनचे अध्यक्ष परेश तेलंग, सरचिटणीस सूर्यकांत रेवडेकर, भगवान लुडबे, लक्ष्मण गरड यांच्यासह केबल चालकांनीही शिवसेनेत प्रवेश केला. मनसे केबल सेनेचे उपसचिव भारत लुडबे यांचाही पक्षप्रवेश झाला.
पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस बाबा नाईक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच शेकापचे जनरल सेक्रेटरी अशोक नाईक, प्रदीप पटेल, अनिल माने, विकास जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती भगवा झेंडा घेतला.
राज्यातील विविध भागांतून पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत असल्याने पक्षाच्या संघटनविस्ताराला व्यापक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. विविध राजकीय पक्षांतील स्थानिक पातळीवरील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे आगामी काळात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार प्रा. मनीषा कायंदे, शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन सी यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.