Eknath Shinde announces Bachchu Kadu and Neelam Gorhe as Shiv Sena candidates for MLC elections. 
महाराष्ट्र

मोठी बातमी! शिंदेंचा मोठा निर्णय, विधान परिषदेसाठी बच्चू कडूंसह या नेत्याला उमेदवारी

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि निलम गोऱ्हे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बच्चू कडू यांच्या पक्षप्रवेशानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला.

Namdeo Kumbhar

MLC election Maharashtra candidates : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि निलम गोऱ्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज शिवसेनेते प्रवेश केला, त्यानंतर त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार, १० पैकी २ जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. तर ६ जागा भाजप आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या वाट्याला आली आहे.

विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपच्या ६ नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून निलम गोऱ्हे आणि बच्चू कडू थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करतील. १२ मे २०२६ रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होईल.

विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम कसा ?

निवडणुकीची अधिसूचना जारी – २३ एप्रिल, २०२६ (गुरुवार)

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ३० एप्रिल, २०२६ (गुरुवार)

उमेदवारी अर्जांची छाननी – २ मे, २०२६ (शनिवार)

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – ४ मे, २०२६ (सोमवार)

मतदानाचा दिनांक – १२ मे, २०२६ (मंगळवार)

मतदानाची वेळ – सकाळी ०९:०० ते दुपारी ०४:०० पर्यंत

मतमोजणी (निकाल) – १२ मे, २०२६ (मंगळवार) सायंकाळी ०५:०० वाजता

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक – १३ मे, २०२६ (बुधवार)

बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश -

प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज धनुष्यबाण हाती घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केलाय. झेंडा बदलला असला तरी अजेंडा तोच राहणार असं यावेळी बच्चू कडू यांनी म्हटले आहे. दिव्यांग, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शिंदेसेनेत जात असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिलीय. तर शिंदेसेनेत प्रवेश करणार असलो तरी प्रहार संघटना कायम राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ही लोकशाही आहे, दडपशाही नाही! सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा

Aalyache Pani: १५ दिवस आल्याचे १ ग्लास पाणी प्यायल्याने काय होते?

आणखी एका दिग्गज नेत्याची एक्झिट! भाजप आमदार,माजी मंत्र्यांचे निधन! राज्याच्या राजकारणात शोककळा

Drinking Milk At Night: रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने शरीरात काय होतं?

Gold Earrings For Married Woman: महिलांसाठी सोन्याचे कानातले; ‘या’ 5 ट्रेंडी डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT