Shinde Sena’s aggressive seat demand puts BJP on the backfoot as Mumbai BMC election strategies intensify. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे करणार उद्धव ठाकरेंना मदत? भाजपची कोंडी करण्यासाठी दोघांमध्ये नेमकं काय ठरलंय?

BJP vs Shinde Sena Tensions: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपची कोंडी करत शिंदेसेना ठाकरेंना मदत करण्याची शक्यता आहे....मात्र शिंदेंची ही रणनीती नेमकी कशी असणार आहे... आणि भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत नेमकं काय आहे...

Bharat Mohalkar

भाजपनं मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर दावा ठोकून शिंदेसेनेला अस्वस्थ केलंय... दुसरीकडे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपला तगडी टक्कर दिल्यानंतर शिंदेसेना आता मुंबई महापालिकेत 227 पैकी 125 जागांसाठी आग्रही आहे... तर शिंदेसेना 125 जागांचा प्रस्तावच भाजपला पाठवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.. मात्र शिंदेंच्या या खेळीचा ठाकरेंना कसा फायदा होऊ शकतो..

भाजप शिंदेसेनेचा 125 जागांचा प्रस्ताव स्वीकारण्याची शक्यता कमी

शिंदेसेना स्वबळावर लढली तर भाजपला मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता

भाजपच्या मतविभाजनामुळे ठाकरेंचा महापालिका जिंकण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता

खरंतर शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरेंच्या 97 पैकी 65 नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केलाय...शिंदेसेना मजबूत झालीय... त्यामुळे शिंदेसेना 125 जागांचा प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती समोर आलीय.. आता शिंदेसेना सोबत आली तर भाजपला त्याचा फायदा मिळण्याचा अंदाजही अंतर्गत सर्व्हेतून दिसून आलाय.. तो नेमका कसा?

भाजपला स्वबळावर सत्ता मिळणं कठीण

शिंदेंनाही स्वबळावर मोठं यश मिळणं अवघड

महायुतीत लढल्यास भाजप आणि शिंदेंनाही फायदा होण्याची शक्यता

महायुतीत लढल्यास ठाकरेंच्या 16 आणि काँग्रेसच्या 8 जागा भाजप जिंकण्याची शक्यता

नव्या संख्याबळानुसार भाजपला 106 जागा मिळण्याची शक्यता

106 जागानंतरही भाजपला बहुमतासाठी 8 जागा कमी पडण्याचा अंदाज

त्यामुळे शिंदेसेनेला सोबत घेणं भाजपला गरजेचं

खरंतर महायुतीत सारं काही आलबेल नाही... भाजप आणि शिंदेसेनेत अंतर्गत कुरघोडी सुरु आहेत...त्यामुळे भाजपनं शिंदेसेनेचा प्रस्ताव मान्य केला नाही आणि शिंदेसेना स्वबळावर लढली तर त्याचा ठाकरेंना फायदा होण्याची शक्यता आहे...त्यामुळे शत्रूचा शत्रू मित्र यानुसार शिंदेसेना भाजपची जिरवण्यासाठी ठाकरेंना मदत करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IndiGo हाजिर हो! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स

खूशखबर! नवी मुंबईला मिळणार आणखी एक मेट्रो; कुठून कुठे धावणार ? जाणून घ्या

IAS Transfer: राज्यातील १३ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, नवं सरकार येताच बिहारमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल

Tuesday Horoscope : प्रेम, पैसा आणि यश मिळणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरू

धनूभाऊंनी दिली जरांगेंची सुपारी? जरांगेंच्या घातपातासाठी अडीच कोटींची डील?

SCROLL FOR NEXT