Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

Mahayuti : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे महायुतीत गँगवॉर सुरू असल्याचा खळबळजनक आरोप नाना पटोलेंनी केलाय...महायुतीत गँगवॉरची चर्चा का सुरू आहे....पाहूयात स्पेशल रिपोर्ट...

Bharat Mohalkar

Maharashtra Political News : राज्याचं पावसाळी अधिवेशन विविध मुद्द्यांवरुन तापलंय...दरम्यान अधिवेशन सुरु असतानाच शिंदेंनी गुपचूप दिल्ली गाठत भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आलीय... शिंदेंनी अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तर या भेटीबाबत उदय सामंतांनी सूचक संकेत दिलाय... त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय.. महायुतीतील गँगवॉरमुळेच एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौरा केल्याचा टोला काँग्रेसने लगावलाय. तर शिंदेंनी गुरु बदल्याचा टोला ठाकरे गटानं लगावलाय. खरंतर 2 दिवसांपुर्वीच एकनाथ शिंदे अहमदाबादला जाऊन आले होते.. त्यानंतर शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात... मात्र नाराजीचा हा अंक महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर सुरु झाल्याचं म्हटलं जातंय...

- रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन शिंदे गट नाराज

- फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एसटी बस खरेदीच्या चौकशीचा निर्णय

- शिंदेंच्या कार्यकाळातील काही प्रकल्पांची चौकशी तर काही प्रकल्प रद्द

- देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमधील वाढती जवळीक

- शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या निधीला कात्री लावण्यामुळे नाराजी

- मराठीच्या मुद्द्यावर शिंदेंची झालेली कोंडी

निधी वाटप, मंत्रिपद, पालकमंत्रिपद अशा अनेक कारणांमुळे महायुतीत अंतर्गत खडाजंगी रंगल्याची चर्चा आहे.. खरंतर एवढी गुप्तता पाळून शिंदेंनी दिल्ली दौरा केल्याने महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत महायुतीची वज्रमूठ दिसणार की काही वेगळं समीकरण पहायला मिळणार याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Hospitalized: दिग्गज अभिनेत्रीची तब्येत बिघडली; हॉस्पिटल मधील फोटो व्हायरल; नाकातील ट्यूब पाहून चाहते चिंतेत

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रमशाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT