eknath shinde Saam tv
महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना शब्द, 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळंच सांगितलं

ladki bahin Yojana : लाडक्या बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं भाष्य केलं आहे. 1500 रुपयांचे 2100 रुपये लवकरच करणार असल्याचे शिंदेंनी सांगितले.

Vishal Gangurde

ऐन निवडणुकीत लाडकी बहीण योजनेवर एकनाथ शिंदेंचं मोठं भाष्य

दरमहा 1500 रुपये 2100 करण्यावर शिंदेंनी केलं मोठं भाष्य

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साताऱ्यातून लाडकीवर केलं भाष्य

महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेवरून मतदारांना वळवण्याचा प्रयत्न केला. महापालिका निवडणुकीत शासनाने डिसेंबर महिन्याचा हप्ता १४ जानेवारी रोजी दिला होता. आता लाडकी बहीण योजनेचे महिन्याला मिळणारे १५०० रुपये २१०० रुपये करण्याचीही मागणी सातत्याने केली जात आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं भाष्य केलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील एका सभेत एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर महत्वाचं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, 'पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना देतो, त्याच्या अनेक यशस्वी कथा आहेत. 1500 रुपयांचे 2100 रुपये योग्य वेळी करणार आहे. आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पाळणार आहोत. मी बोलतो ते करून दाखवतो'.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, 'तुम्ही माझं काम अडीच वर्षात पाहिलं असेल. मी अडीच वर्षात अडीच तास शांत झोपलो नसेल. लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाला निवडून आणायचं ठरवलं होतं. 45 हजार कोटी वर्षाचा खर्च होता. हा खर्च करण्याची हिंमत भल्याभल्यांची झाली नव्हती. जे खोडा घालायचे, त्यांना 232 नंबरचाचा घोडा दाखवला. महारष्ट्राच्या इतिहासात 232 जागा महायुतीच्या कधी निवडून आल्या नव्हत्या. माझी कर्मभूमी मुंबई असली, तरी माझी जन्मभूमी सातारा आहे. सातारा जिल्ह्याची गौरवशाली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण कारभार करतोय'.

'आधीच्या मुख्यमंत्र्यांना स्पीड ब्रेकर आणि स्थगितीशिवाय काही माहीत नव्हतं. फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम कराव लागतं. मी मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्या स्थगित्या उठवल्या. कोकण ते पश्चिम महाराष्ट्राजवळ आणण्याचे काम सुरु झालंय. आम्ही उठाव करून साडेतीन वर्ष झाले. विधानसभा निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला. शिवसेनाच या भूमीचा आणि लेकरांचा विचार आणि प्रगती करू शकते, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT