Ajit pawar, Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी: अजित पवार

तातडीने सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

साम टिव्ही ब्युरो

गडचिरोली: तातडीने सरकारने अधिवेशन बोलावले पाहिजे, राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. गडचिरोलीत अजुनही पंचनामे झालेले नाहीत. घराच्यासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने लवकरात लवकर पंचनामे करुन मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

शेतकऱ्यांचे रब्बीचे पिक गेल्यामुळे आता त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी, त्याचबरोबर सरकारने पंचनामे करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, पूरग्रस्त भागाची पाहणी करावी असा टोलाही एकनाथ शिंदे यांना लगावला. गडचिरोली जिल्ह्यात दहा लाख हेक्टर जमीनी पूरामुळे बाधित झाल्या आहेत. ओला दुष्काळ जाहीर करुन ददत जाहीर करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली. तसेच तातडीने अधिवेशन घेण्याची गरज राज्याला आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊन लोकांना कामाला लावणे चुकीचे आहे, असंही पवार (Ajit Pawar) म्हणाले.

याअगोदर आम्हीही सरकारमध्ये काम केले आहे. प्रशासनात काम केले आहे. त्यामुळे त्यांनी जरा बाहेर पडून नकसानग्रस्त भागाची पाहणी करावी. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही मदत मिळाली पाहिजे, तसेत धरणातून पाण्याचा विसर्ग करताना सतर्कता राखली गेली पाहिजे. शेजारच्या असलेल्या तेलंगणा राज्याशी सपर्क करुन तोडगा काढला पाहिजे अशी मागणी पवार (Ajit Pawar) यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे सत्र न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल २९ जूनला देणार

Lohgad Case: ‘केतन जिवंत आहे’ ऐकताच सियाचा थरकाप उडाला थरकाप; लोहगड तरूणाच्या हत्येप्रकरणी मोठा गौप्यस्फोट समोर

Qutb Minar : जगातील सर्वात उंच विटांची मिनार! कुतुब मिनारला 'कुतुब' नाव कसे मिळाले? वाचा खास कनेक्शन

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

Nasrapur Case Verdict : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाने दिला निकाल, नराधम भीमराव कांबळे अखेर दोषी

SCROLL FOR NEXT