Political Twist in Raigad: Eight Top MNS Leaders Join Shinde Sena saam tv
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी टाकला मोठा डाव; रायगडमध्ये मनसेला भगदाड,८ प्रमुख नेत्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra Politics : रायगडमध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का बसला आहे. आठ प्रमुख नेत्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Bharat Jadhav

  • राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा राजकीय धक्का.

  • मनसेच्या आठ प्रमुख नेत्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत प्रवेश केला.

  • रायगडमध्ये शिंदे सेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याची चर्चा.

रायगडच्या राजकीय वर्तुळातुन मोठी बातमी हाती आली आहे.राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून रायगड जिल्हा राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत असतो. आज सकाळपासून रायगड जिल्ह्यात घडामोडी घडत आहेत. भाजपच्या नेत्यानं राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजकीय डाव टाकत राज ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. (Maharashtra Politics: Shinde Deals Big Blow To Mns As 8 Leaders Join Shiv Sena In Raigad)

मुंबईतील सिद्धिविनायक गणेश मंदिरातील देणगीत होणाऱ्या चोरीवरून राज ठाकरेंनी शिंदे गटावर हल्ला चढवलाय. त्याच दरम्यान शिंदेंनी राज ठाकरेंना जबर धक्का दिलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ९ ऑगस्टच्या दिवशी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्याआधी एकनाथ शिंदेंनी त्यांना मोठा धक्का दिलाय.

दक्षिण रायगडमधील मनसेच्या ८ प्रमुख नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंनी आपल्या पक्षात म्हणजेच शिवसेनेत प्रवेश करून घेतलाय. जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या प्रमुख नेत्यांसह शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थिती माणगाव येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसे माजी रायगड संपर्क अध्यक्ष दिलीप सांगळे, विद्यार्थी सेना रायगड जिल्हा अध्यक्ष प्रतिक रहाटे, तळा तालुका अध्यक्ष बाबू फुलारे, माथाडी अध्यक्ष राजा टेंबे या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी राज ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याला काही बाकी असतानाच राज ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय. जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले. त्यानंतर आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे मनसेची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान मनसेमध्ये नव्याने झालेले पदाधिकारी फेरबदल आणि कार्यपद्धतीवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण रायगडमध्ये मनसेत राजीनामा सत्र सुरु झाल्याने रायगडमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीत पुन्हा खदखद! शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा तडकफडकी राजीनामा; काहीवेळातच हाती घेतलं कमळ

Maharashtra News Live Update: "संजय राऊतांचे वय झाले, 'साठी बुद्धी नाठी': सातारा सांगलीचे विधान परिषद आमदार धैर्यशील कदम यांची टीका

देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ति, ते वयाच्या 27 व्या वर्षी...; चंद्रकांत पाटील हे काय बोलून गेले? VIDEO

SRA फ्लॅट मिळवून देण्याच्या आमिषाने लाटले ५.५७ कोटी; काँग्रेस खासदाराच्या पीएवर गुन्हा दाखल

खड्ड्याचा जीवघेणा सापळा! दुचाकी घसरली अन् महिलेचा ट्रकखाली दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT