maharashtra politics  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : माझ्या खात्यावर ५० कोटी आले असतील, तर...; गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांचा बापच काढला

Maharashtra Political News : मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. ते पंढरपुरात बोलत होते.

Vishal Gangurde

पंढरपूर : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना थेट राऊत यांचा बापच काढला. संजय राऊत यांनी 50 कोटी रुपये माझ्या बँक खात्यावर आले असा आरोप केला. माझ्या खात्यावर जर पैसे आले असतील तर ते पैसे राजाराम राऊत यांच्या नावावर ठेवावेत, अशा शब्दात राऊत यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला. माजी आमदार भास्कर जाधव नाराज हे उद्धव सेनेत नाराज असल्याचाही दावा पाटील यांनी केला.

स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे लागले होते. पक्ष आपण हायजॅक करू असे म्हणून मागे लागले होते. पण शिंदे साहेबांनी ऐकले नाही, असे पाटील म्हणाले.

भास्कर जाधव ठाकरे गटात नाराज?

'संजय राऊत यांनी उद्धव साहेबांना वेगळ्या मार्गाने घेऊन गेले. म्हणूनच आज लोक नाराज होत आहे. भास्कर जाधव यांच्यासारखे लोकही शिवसेना पक्षात नाराज आहेत, असाही खळबळजनक दावा यावेळी गुलाबराव पाटील यांनी केला.

'संजय राऊत यांच्याकडे फक्त भोंगा वाजवण्याचेच व्हिजन आहे. पक्ष वाढ करणे. विकासाचे व्हिजन नाही. त्यामुळे राऊत यांना कधी खडी , कधी रस्ता खाल्ला म्हणून बडबड करावी लागते, अशा शब्दात राऊत यांना समृद्धी आणि शक्तिपीठ महामार्गावरून वरून लक्ष केले. विधिमंडळातील चांदीच्या ताटात झालेल्या जेवणावळीवरही गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं. चांदीच्या ताटा कुठल्या दुकानातून घेतल्या याची आपल्याला माहिती नाही, असेही पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi School : मुंबईत मराठी शाळांची दैना, 6 वर्षांत 39 शाळा बंद | VIDEO

EPFO New Rule: EPFO च्या नियमांत मोठा बदल! कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांनाही होणार फायदा; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर...

Accident: संभाजीनगरमध्ये अपघाताचा थरार, भरधाव ट्रकने एकाच कुटुंबातील चौघांना चिरडलं, वडिलांसह २ मुलांचा जागीच मृत्यू

GK: चॉपस्टिक्सचा शोध कधी आणि का लागला? जाणून घ्या त्यामागील खरे कारण

SCROLL FOR NEXT