Eknath Shinde Group Hingoli MP Hemant Patil Tehsildar threat Video Viral Saam TV
महाराष्ट्र

Nanded News: अंगात मस्ती येऊ देऊ नका, एका मिनिटात उतरवू; शिंदे गटाच्या खासदाराची तहसीलदारांना धमकी, VIDEO व्हायरल

Hingoli MP Hemant Patil Viral Video: माहूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

Hingoli MP Hemant Patil Viral Video: अंगात मस्ती येऊ देऊ नका, एका मिनिटात मस्ती उतरविन असा धमकी वजा इशारा हिंगोलीचे (Hingoli News) शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी माहूरच्या तहसीलदारांना दिला आहे. माहूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

खासदार हेमंत पाटील यांनी सोमवार सायंकाळी माहूर तालुक्यातील काही गावांचा आणि शेतशिवाराचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान माहुरचे तहसीलदार किशोर यादव यांच्याबाबत अनेकांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या.

शेतकऱ्यांच्या (Farmers) तक्रारींमुळे खासदार हेमंत पाटील यांचा पारा चढला. त्यांनी थेट तहसीलदारांना अरेरावीची भाषा केली. "तू काय ब्रिटीशांची औलाद आहेस का? लोकांचे प्रश्न कळत नाहीत का? मस्ती चढलीय का?" असं म्हणत त्यांनी तहसीलदार किशोर यादव यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

"स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहूरच्या नुकसानीबाबत माहिती घेत असताना त्यांनाही तू तुझाच शहाणपणा शिकवतोस का?" अशा विविध कारणावरून खासदार हेमंत पाटील यांनी तहसीलदारांची खरडपट्टी काढली.

इतकंच नाही तर, अंगात मस्ती येऊ देऊ नका, एका मिनिटात मस्ती उतरविन असा धमकी वजा इशारा सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी माहूरच्या तहसीलदारांना दिला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajgira Paratha Recipe : श्रावणात उपवासाला करा झटपट राजगिऱ्याचे पराठे, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस; ५७ बंधारे पाण्याखाली | VIDEO

Menstrual Care: मासिक पाळीच्या वेळी स्तन दुखतात? जाणून घ्या यामागील हार्मोनल बदल आणि उपाय

Pune Crime: पिंपरीमध्ये धर्मांतराचा प्रयत्न, गलेलठ्ठ पैशांचं आमिष, अमेरिकन नागरिकाला अटक

Kokan Ganeshotsav : गणेशभक्तांचा प्रवास यंदाही खड्ड्यातून, मुंबई-गोवा महामार्गाची चाळण; कोकणवासीयांसमोर विघ्न कायम

SCROLL FOR NEXT