Jalgaon Shivsena News Saam TV
महाराष्ट्र

Jalgaon News: आदित्य ठाकरेंविरोधात शिंदे गट आक्रमक; मुक्ताईनगरमध्ये प्रतिकात्मक पुतळा जाळला, नेमकं कारण काय?

Jalgaon Shivsena News: आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जाणीवपूर्वक अपशब्द वापरले, असा आरोप शिंदे गटाने केला आहे.

Satish Daud

Jalgaon Breaking News

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी जाणीवपूर्वक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, असा आरोप करत शिंदे गट आक्रमक झाला आहे. जळगावच्या मुक्ताईनगर येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आदित्य ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

इतकंच नाही, तर काही कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात तणावपूर्व शांतता आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट होता, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका मुलाखतीतून केला. त्यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला.

एकनाथ शिंदे यांच्याकडे कॅशचं गोडाऊन सापडलं होतं. गोडाऊनवर इन्कम टॅक्सची धाड पडली होती. त्यावेळी भाजप नेत्यांनी त्यांना सोबत येताय की, जेलमध्ये टाकू, असं धमकावलं होतं, त्यामुळे शिंदेंनी शिवसेना फोडून भाजपमध्ये प्रवेश केला, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजममध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असे शिंदे म्हणाले होते, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्या या दाव्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे. मंगळवारी (ता. २३) दुपारी ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जाणीवपूर्वक अपशब्द वापरले, असा आरोप शिंदे गटाने केला. ठाण्यातील आंदोलनानंतर आता मुक्ताईनगरमध्येही शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आदित्य ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT