Shiv Sena (Shinde faction) workers protest and block Minister Ganesh Naik’s convoy in Navi Mumbai amid invitation row controversy. saam tv
महाराष्ट्र

शिंदे-नाईंकांमध्ये पुन्हा मानापमान नाट्य, शिदेंना डावललं, नाईकांची गाडी अडवली

Eknath Shinde Vs Naik Navi Mumbai Political Clash: नवी मुंबईत गेल्या दोन आठवड्यात दुसऱ्यांदा शिंदेंना सरकारी कार्यक्रमातून डावलण्यात आलंय. आणि यामुळेच शिंदेंच्या शिवसैनिकांनी थेट नाईकांची गाडीच अडवली. नेमका काय कार्यक्रम होता आणि त्यावरून कसा राडा झाला..यावरचा हा रिपोर्ट......

Snehil Shivaji

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री असलेल्या गणेश नाईकांमध्ये मानापमान नाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळाला. 10 दिवसात दोनदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डावलल्याचा आरोप करत शिंदेसेना संतप्त झाली. या वादाला कारण ठरली ही निमंत्रण पत्रिका

ही निमंत्रण पत्रिका पाहा, नवी मुंबईतल्या आरोग्य सेवांच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव वगळण्यात आलंय. या पत्रिकेत वनमंत्री गणेश नाईक, खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांची नावं आहेत. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव गायब असल्यानं नवी मुंबईत शिंदेसेना आणि नाईकांमधील जुना वाद पुन्हा नव्यानं पेटला. यावेळी शिंदेगटाच्या कार्यकर्त्यांनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांची गाडी अडवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत घडल्या प्रकाराचा निषेध केलाय. तर महापौरांनी निमंत्रण पत्रिकेचं समर्थन केलंय.

विशेष म्हणजे भाजपच्याच आमदार मंदा म्हात्रेंनीही शिंदेंची पाठराखण करत नाईकांवर आगपाखड केली. तर नाईकांनीही तेवढ्याच आक्रमकपणे त्यांना प्रत्युत्तर दिलंय. या दोन्ही नेत्यांमधील शह कटशहांची पार्श्वभूमी विसरुन चालणार नाही. 2022 पासून शिंदेसेना भाजपसोबत असली तर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये धुमसत असलेला वाद काही शमलेला नाही. पाहा या आधी या २ नेत्यांमध्ये झालेल्या वादाच्या घटना...

जून 2026

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाव वगळलं.

मार्च 2026

गणेश नाईक नवी मुंबईपुरते मर्यादित नेते म्हणत खासदार श्रीकांत शिंदेंची गणेश नाईकांवर टिका.

नोव्हेंबर 2025

नवी मुंबई महापालिकेत 14 गावांच्या समावेशाच्या एकनाथ शिंदेच्या निर्णयाला गणेश नाईकांकडून जोरदार विरोध

फेब्रुवारी 2025

शिंदेंना शह देण्यासाठी गणेश नाईक यांचे नवी मुंबई सोडून ठाण्यात जनता दरबारचं आयोजन

हा वाद केवळ निमंत्रण पत्रिकेपुरता मर्यादित नाही. हा संघर्ष आहे नवी मुंबईतील राजकीय वर्चस्वाचा. एकीकडे ठाणे जिल्ह्यात आनंद दिघेंनंतर एकनाथ शिंदेंनी एकहाती नेतृत्व निर्माण केलं. तर दुसरीकडे नवी मुंबईत गणेश नाईक आजही किंगमेकरच्या भूमिकेत राहिलेत. त्यामुळे नवी मुंबईत शिंदेंचा विस्तार आणि नाईकांचा प्रभाव यांच्यातील संघर्ष वेळोवेळी पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola : तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या धसका; भीतीनं शहरात विक्रीच बंद

Fact Check: 2 कोटींच्या नोटांचा पाऊस? 2 लाखांचे केले 2 कोटी?

Maharashtra News Live Update: पुण्यातील 'त्या' मिठाई दुकानाचा परवाना अखेर रद्द

ठाकरेसेनेत पुन्हा उभी फूट? ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? राजकारणात खळबळ

Mawa Kheer Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि गोड मावा खीर, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT