Eknath Shinde meets PM Narendra Modi in Delhi amid growing speculation of tensions within the Mahayuti alliance. Saam Tv
महाराष्ट्र

महायुतीत पुन्हा रंगलं नाराजीनाट्य? शिंदेंनी केली मित्रपक्षांची तक्रार?

Mahrashtra Politics: महायुतीत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगलीय...शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन राजकारण तापलंय... शिंदेंनी पुन्हा एकदा मोदींच्या दरबारी मित्रपक्षांची तक्रार केली आहे का?... शिंदेंच्या नाराजीचं आणखी काही कारण आहे का? पाहूयात एक खास रिपोर्ट...

Bharat Mohalkar

महायुतीत पुन्हा एकदा नाराजीनाट्याच्या चर्चा रंगल्या आहेत... आणि त्याला कारण ठरलंय... राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा... एकनाथ शिंदेंनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत 2 तास चर्चा केली... याच भेटीदरम्यान शिंदेंनी राज्यातील भाजप नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.....

रायगड, फलटणमध्ये बहुमत असूनही तडजोड करावी लागली

छ. संभाजीनगरमध्येही शिंदेंना झेडपीत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हालचाली

अर्थसंकल्पात शिंदेसेनेच्या मंत्र्यांबाबत निधीवाटपातील दुजाभाव

आता याच मुद्द्यावरुन विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय... काँग्रेस नेते नाना पटोलेंनी छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषदेतील शह-काटशहावर बोट ठेवून सूचक वक्तव्य केलंय... तर राऊतांनीही खोचक टोला लगावलाय. त्यामुळेच आपण प्रत्येक अधिवेशनावेळी खासदारांची बैठक घेण्यासाठी दिल्लीत येत असतो, असं म्हणत शिंदेंनी नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत...

खरंतर नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांच्या काळात महायुतीत शह-काटशहाच्या राजकारणाला जोर आला होता... मात्र अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर भाजप आणि शिंदेसेनेतील कुरघोडीचं राजकारण कमी झाल्याची चर्चा होती.. मात्र आता जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीच्या निवडीत शिंदेंना बायपास केलं जात असल्याची चर्चा रंगली.... त्यामुळे शिंदेंनी दिल्ली वारी करुन नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जातंय.. मात्र शिंदेंच्या दिल्ली वारीनंतर भाजपचे वरीष्ठ नेते समेटाची भूमिका घेणार की अंतर्गत संघर्ष आणखी वाढत जाणार... याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Tourism: दूर जायची गरजच नाही! नाशिकपासून फक्त २ तास अंतरावर आहे हे सुंदर हिल स्टेशन

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यात वादळी पावसाने घेतला एक बळी

Konkan Tourism : कोकणात मामाच्या गावाला गेलाय? मग 'हा' स्वर्गाहून सुंदर समुद्रकिनारा एकदा पाहाच

भीषण अपघाताने संसार उद्ध्वस्त; बस-दुचाकीच्या धडकेत नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

Crime News: बायकोचे दिव्यांग व्यक्तीसोबत संबंध, नवऱ्याने त्याला शेतात नेऊन दारू पाजली आणि...! 37 दिवसांनी उघड झालं चक्रावणारं सत्य

SCROLL FOR NEXT