Eknath Shinde seen in Delhi ahead of key political meetings with BJP leaders, sparking speculation across Maharashtra's political landscape. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मित्रपक्षांमधील इमकमिंगने शिंदे अस्वस्थ, दिल्लीच्या वर्तुळात 'कुछ बडा होने वाला है'

Delhi Diaries: कुछ बडा होने वाला है, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.. आणि नेमकं याच पार्श्वभुमीवर 8 दिवसात एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर आहेत.. मात्र या शिंदेंच्या दिल्लीवारीमागे नेमकी काय कारणं आहेत? शिंदेंची कोंडी कोण करतयं?

Bharat Mohalkar

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभुमीवर भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरु आहे..याच इनकमिंगमुळे शिंदे सेनेच्या नेत्यांच्या मतदारसंघात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे... त्यामुळेच अस्वस्थ असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दिल्ली दरबारी जाणार असल्याची माहिती समोर आलीय..मात्र असे कोणते नेते आहेत ज्यांच्या भाजप प्रवेशामुळे शिंदे सेना अस्वस्थ झालीय

मित्रपक्षांमध्ये इनकमिंग, शिंदे सेना अस्वस्थ

पाटणमध्ये सत्यजित सिंह पाटणकरांच्या माध्यमातून शंभुराज देसाईंवर कुरघोडीचा प्रयत्न

पुरंदरच्या संजय जगताप यांच्या प्रवेशामुळे विजय शिवतारे अडचणीत

पंडित पाटील यांच्या प्रवेशामुळे महेंद्र दळवींची कोंडी

जालन्यात कैलास गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशाने अर्जुन खोतरकरांपुढे आव्हान

भाजपमधील इनकमिंगमुळे पक्षात अस्वस्थता असल्याचा दावा शिंदे सेनेने फेटाळून लावलाय...

खरं तर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय.. उद्धव ठाकरे हेसुद्धा इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत.. त्यापार्श्वभुमीवर शिंदे दिल्लीत जाऊन खासदार आणि भाजपच्या नेत्यांसोबत बैठका घेणार असल्याची माहिती समोर आलीय...

अस्वस्थ एकनाथ शिंदे अमित शाहांची भेट घेण्याची शक्यता

उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर NDA नेत्यांच्या भेटीगाठी

शिंदे सेनेच्या खासदारांसोबत बैठक घेणार

एकीकडे दिल्लीत घडणाऱ्या राजकीय घडामोडी आणि दुसरीकडे महाराष्ट्रात सुरू असलेलं कुरघोडीचं राजकारण ... त्यामुळे दिल्ली दरबारी शिंदेंच्या तक्रारीची दखल भाजपचं नेतृत्व घेणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cinnamon For Skin : चेहऱ्यावरील सगळ्या समस्या दूर करणारा नैसर्गिक उपाय; तमालपत्र आणि दालचिनीचा फेसपॅक

DHFL Scam : DHFL आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मोठी घडामोड; अविनाश भोसलेंना दिलासा, मालमत्ता मुक्त करण्याचा ईडीचा प्रस्ताव

Kaas Valley Of Flowers : पृथ्वीवरच्या स्वर्गाचं सौंदर्य बहरलं, कास पठारावर पांढऱ्याशुभ्र चवर फुलांचा बहर

Baba Vanga: एलियन्स येणार पृथ्वीवर, AI चा कब्जा आणि...; बाबा वेंगाची थरकाप उडवणारी भविष्यवाणी

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांचा पहिलाच नाशिक दौरा

SCROLL FOR NEXT