Eknath shinde Vs uddhav thackeray  Saam TV
महाराष्ट्र

Eknath Shinde: काही फुसके बार आले होते, जे न वाजताच निघून गेले...; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: काल मुंब्रा्यात झालेल्या गोंधळानंतर शिंदेंनीही उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

Ruchika Jadhav

Eknath Shinde News:

"सध्या ठाण्यात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी सुरू झाली असून आज शहरात काही फुसके बार आले होते जे न वाजताच निघून गेले. दुसरीकडे शिवसैनिकांचे फटाके असे काही वाजले की त्यांना माघार घ्यावी लागली.", अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

शनिवारी मुंब्य्रातील शिवसेनेच्या शाखेवरुन शिवसेना शिंदे आणि ठाकरे असे दोन्ही गट आमने सामने आले होते. मुंब्य्रातील शिवसेना शाखा तोडल्यानंतर दोन्ही गटात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. याच शाखेच्या पाहणीसाठी काल स्वत: उद्धव ठाकरे मुंब्रा्यात आले होते. मात्र पोलिसांच्या विनंतीमुळे त्यांना माघारी जावे लागले. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जहरी टीका केली होती. काल मुंब्रा्यात झालेल्या गोंधळानंतर शिंदेंनीही उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

सत्तेच्या माजावर शाखा पाडली - उद्धव ठाकरे

"आज पोलिसांची हतबलता दिसली. या सत्ताधाऱ्यांनी बारसू आंदोलकांवर लाठीचार्ज करायला लावला. वारकऱ्यांवरही लाठीचार्ज करायला लावला. मी मुद्दाम या ठिकाणी आलो. सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. हे नेभळट असून चोर आणि गद्दार आहेत. हे नामर्द पण आहेत. अशी नामुष्की महाराष्ट्राला याआधी कधी आली नाही", अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर (CM Eknath Shinde) काल टीका केली होती. माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पोलिसांची ही हतबलता

"हातोडा मारणारे हे नकली शिवसैनिक असून ते लोकांसमोर जाणार नाहीत. मी कुठेही पोलिसांचा अनादर होईल असे वागलेलो नाही. लहान मुले आणि मातांवर याआधी मराठा आंदोलनावर लाठीचार्ज करायला लावला होता. पोलिसांची ही हतबलता आहे. सत्तेच्या माजावर आज शाखा पाडली, पुढच्या काळात घरं पाडतील.", असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

ठाकरे गटाकडून कायदेशीर लढाईची तयारी!

काल झालेल्या हायहोल्टेज ड्राम्यानंतर मुंब्रामधील शाखेचा वाद आता कोर्टात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शाखेवर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट आपला दावा करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून कायदेशीर बाजू तपासून न्यायालयात दाद मागतली जाणार आहे. ठाकरे गटाकडून याबाबत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस कॉन्स्टबलचा रस्ते अपघातात मृत्यू, बातमी कळताच पत्नीला मोठा धक्का, निराशेतून धक्कादायक पाऊल

Hardik Pandya: हार्दिक पंड्याच्या घड्याळाची किंमत आशिया कपच्या प्राइज मनीपेक्षा ८ पट जास्त; किंमत ऐकून बसेल धक्का

Mumbai Crime: साहेब मला अटक करा मी..., बहिणीच्या बॉयफ्रेंडची हत्या करून आरोपी पोलिस ठाण्यात गेला; मुंबई हादरली

Kunkeshwar Temple : कोकण दर्शनात ‘कुणकेश्वर मंदिर’ ठरेल ट्रिपसाठी खास; वाचा नव्या डेस्टिनेशनचे वैशिष्ट्य

Jio Recharge Offer: बल्ले-बल्ले! जिओ दररोज देणार फ्री २.५ GB डेटा अन् ओटीटी सबस्क्रिप्शन फ्री, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT