Eknath Shinde 
महाराष्ट्र

कुत्रे झुंडीत येतात, वाघ एकटा येतो; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशापासून ते शिवसेना फुटीपर्यंत अनेक मुद्द्यांवर शिंदेंनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर निशाणा साधला.

Namdeo Kumbhar

"कुत्रे झुंडीत येतात, पण वाघ एकटाच येतो आणि शिकार करतो. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे" अशा आक्रमक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

शिवसेना जमिनीचा तुकडा नाही; सातबारावर नाव लावून वारसदार होता येत नाही

उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, केवळ रक्ताचे नाते सांगून किंवा सातबारावर नाव लावून कोणी बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार होऊ शकत नाही, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. "शिवसेना ही काही जमिनीचा तुकडा नाही. शिवसेना हा विचारांचा आणि आपल्या काळजाचा तुकडा आहे. शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून ते एक 'भगवं वादळ' आहे. जे खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व विसरले, ते राजकारणातून संपले आहेत. बाळासाहेबांना त्यांच्या हयातीत त्रास दिला, छळले आणि आज त्यांच्या पश्चात ज्यांचा बाळासाहेबांना तिरस्कार होता, त्यांचाच तुम्ही पुरस्कार करत आहात, ही कसली वारसदारी?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

"शिवसेना पहिल्यांदा राष्ट्रवादीने, तर दुसऱ्यांदा काँग्रेसने फोडली"

शिवसेना वाचवणाऱ्यांवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेताना त्यांनी विरोधकांवर दुटप्पीपणाचा आरोप केला. "ज्यांनी शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी रक्ताचे पाणी केले, त्यांना तुम्ही शिव्या देताय आणि ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना फोडण्याचे काम केले, त्यांच्यासाठी आज ओव्या गात आहात, हा तुमचा कोणता न्याय?" अशी तोफ त्यांनी डागली. बाळासाहेबांचे नाव फक्त नावात असून चालत नाही, तर ते कामात आणि विचारात असावे लागते, असा टोलाही शिंदेंनी लगावला.

गावागावात शिवसेना पोहोचवण्याचे आवाहन

चालू वर्ष हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने, प्रत्येक शिवसैनिकाने गावागावात जाऊन शिवसेना पोहोचवावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. शिवसेनेला महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवणे हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, असे सांगत त्यांनी ही शिवसेना मराठी माणसाच्या स्वाभिमानाची आणि सर्वसामान्य, शेतकरी व लाडक्या बहिणींच्या संरक्षणाची चळवळ असल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

SCROLL FOR NEXT