Anil Parab
Anil Parab Saam Tv
महाराष्ट्र

दापोली रिसॉर्टची जमीन पुण्यातल्या साठेंची; ते काय म्हणाले वाचा!

साम टिव्ही ब्युरो

पुणे : शिवसेना (Shivsena) नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या निवासस्थानासह ७ ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. आज सकाळी ६ वाजेदरम्यान, ईडीचे पथक (ED Raids) अनिल परबांच्या घरी पोहचलं, तेव्हापासून ही कारवाई सुरू आहे. या पथकात जवळपास ४ अधिकारी असल्याची माहिती आहे. दरम्यान, अनिल परब यांच्याशी संबधित चौकशी करण्यासाठी ईडीचं पथक पुण्यातही (Pune) पोहचलं आहे. इतकंच नाही तर, त्यांच्या निकटवर्तींयांवरही ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. (Shivsena Anil Parab Latest News)

पुण्यातील कोथरुड परिसरातील विभास साठे यांच्या घरावर सुद्धा ईडीने छापेमारी केली आहे. अनिल परब यांनी दापोलीतील रिसोर्ट विभास साठे यांच्याकडून विकत घेतला होता. यामध्ये १ कोटी १० लाखांचा व्यवहार झाला तसेच व्यवहारात साठे यांना ब्लॅक मनी दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. खरेदीखत शेतजमीन म्हणून झालं. सगळी कागदपत्रं शेतजमीन म्हणून असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण सातच दिवसांत अनिल परब यांनी २६ जून २०१९ ला ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं. जागा अकृषिक असल्याचा दाखला देखील जोडल्याचा दावा सोमय्यांनी केला होता.

"७ मे २०२१ रोजी तयार केलेल्या कागदपत्रांत ही जागा अजूनही शेतजमीन आहे. पण आज त्या जागेवर प्रत्यक्षात रिसॉर्ट आहे. कोणतीही परवानगी न घेता, सर्व नियमांची पायमल्ली करून लॉकडाऊनदरम्यान अनिल परब यांनी १० महिन्यांत रिसॉर्टचं बांधकाम पूर्ण केलं. १० मे रोजी मी स्वत: दापोलीला रिसॉर्टवर जाऊन हा घोटाळा उघड केला. ११ मे २०२१ ला अनिल परब यांनी बिनशेती जमिनीसाठीचा १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२१ या काळासाठीचा ४ वर्षांचा टॅक्स तलाठीकडे भरला.", असा दावा किरीट सोमय्यांनी केला होता. दुसरीकडे जागा घेतल्यानंतर त्या जागेबाबतीत आपण कोणत्याही प्रकारच्या व्यवहारात नव्हतो, असे यापूर्वीच जागेचे मूळ मालक विभास साठे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले होते.

या रिसॉर्टशी माझा संबंध नाही : अनिल परब

दुसरीकडे या रिसॉर्टशी माझा संबंध नाही. किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी केली आहे. याप्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असल्याचं अनिल परब यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं. किरीट सोमय्यांना माझी माफी मागावी लागेल किंवा शंभर कोटी द्यावे लागतील. मला दिलेल्या नोटीसीला मी उत्तर दिलं आहे. सरकारनं ज्यांच्या नावावर रिसॉर्ट आहे, त्यांना नोटीस दिली आहे, असंही परब यांनी स्पष्ट केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi News : रायबरेलीतून राहुल गांधीं लढवणार लोकसभा, प्रियंका गांधी कुठली पोटनिवडणूक लढवणार?

Educational Tips: 'या' कारमांमुळे मुलं परिक्षेत अपयशी ठरतात

Today's Marathi News Live : मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून आजारी पत्नीला आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी

Rohit Sharma On Captaincy: अखेर मौन सोडलं! कर्णधारपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहितचं रोखठोक उत्तर

kriti Sanon : क्रितूच्या मॅडनेसची बातच और आहे

SCROLL FOR NEXT