Ravindra Waikar Case Saam TV
महाराष्ट्र

Ravindra Waikar Case: ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड, सकाळपासून झाडाझडती

Ravindra Waikar News Today: सदर प्रकरणी एकूण ७ ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात येतेय. भूखंडाचा गैरवापर तसेच तथ्य लपवून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधण्यास परवानगी मिळवल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

Ruchika Jadhav

Ravindra Waikar Face ED:

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. वायकर तसेच त्यांचे पार्टनर्स आणि निकटवर्तीयांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे. सकाळपासूनच ईडीने आपल्या धाडसत्राला सुरूवात केली आहे.

जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीचं धाडसत्र सुरू झालं आहे. सदर प्रकरणी एकूण ७ ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुूरू आहे. भूखंडाचा गैरवापर तसेच तथ्य लपवून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधण्यास परवानगी मिळवल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

नोव्हेंबर २०२३ मध्ये रवींद्र वायकर यांच्यासह सहा जणांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला होता. जोगेश्वरीमधील सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसेच, तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याच्या आरोपाखाली वायकरांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हायाबाबत अद्याप कोणालाही समन्स करण्यात आले नाही. मात्र आज या प्रकरणातील सर्व व्यवसायिक आणि रविंद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे. उद्या शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत. निकालाच्या आदल्या दिवशीच ठाकरे गटातील आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गेट ओलांडून घरात गेली अन् क्षणातच भिंत कोसळली; महिला थोडक्यात बचावली; VIDEO

IB Recruitment: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी; इंटेलिजेंस ब्युरोमध्ये भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Maharashtra politics : अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंच्या खासदाराला फोन, राजकीय खेळी की फक्त शुभेच्छा?

ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

SCROLL FOR NEXT