Maharashtra Politics, Eknath Shinde And Devendra Fadnavis Saam tv
महाराष्ट्र

राज्यात 'आर्थिक सल्लागार परिषद'ची स्थापना; टाटा सन्सचे एन. चंद्रशेखरन अध्यक्ष, तर अनंत अंबानी आणि करण अदानींचा समावेश

आर्थिक सल्लागार परिषद कृषी, बँकिंग, अभियांत्रिकी आणि शिक्षणाशी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित करणारी खाजगी संशोधन संस्था म्हणून काम करेल.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : राज्य शासनाला आर्थिक व अन्य अनुषंगिक मुद्द्यांवर सल्ला देण्यासाठी सरकारने 'आर्थिक सल्लागार परिषद' स्थापन केली आहे. या परिषदेत एकूण २१ सदस्यांची निवड केली असून परिषदेचे अध्यक्षपद टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांकडे देण्यात आले आहे.

दरम्यान या परिषदेमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी आणि अदानी पोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण अदानी यांचा समावेश केल्याने राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आलं आहे. (Eknath Shinde)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था २०२७पर्यंत पाच लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचवायची असेल तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ लाख कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारने बाळगले आहे. परिणामी हे उद्दिष्ट पूर्ण करताना राज्याचे देशांतर्गत उत्पादन पुढील ५ वर्षांत वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आराखडा ही आर्थिक सल्लागार परिषद तयार करणार आहे. (Latest Marathi News)

आर्थिक सल्लागार परिषद कृषी, बँकिंग, अभियांत्रिकी आणि शिक्षणाशी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित करणारी खाजगी संशोधन संस्था म्हणून काम करेल. राज्याचा मानव विकास निर्देशांक (HDI) वाढवण्यासाठी सरकार काही क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Bhiwandi : भिवंडीत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ४ मजली इमारत कोसळली, ९ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

PM Modi: पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान, २५ वर्षांच्या तरुणीविरोधात गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

श्रावण महिन्यात दही आणि कढी का खात नाहीत? काय आहे त्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण?

Girl Child Scheme : राज्य सरकारचा मुलींसाठी खास उपक्रम, गरजू कुटुंबातील मुलींना मिळणार आर्थिक आधार

SCROLL FOR NEXT