Marathwada Earthquake Latest Marathi News Today Saam TV
महाराष्ट्र

Marathwada Earthquake : मराठवाड्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के बसले? जाणून घ्या सविस्तर...

Marathwada Earthquake News Today : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना बुधवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के बसले. अचानक कंपन होऊन जमीन हादरल्याने गाढ झोपेत असलेले नागरिक भयभीत झाले.

Satish Daud

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना बुधवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के बसले. अचानक कंपन होऊन जमीन हादरल्याने गाढ झोपेत असलेले नागरिक भयभीत झाले. घरातील भांड्यांची पडझड झाल्याने काहींनी रस्त्यावर धाव घेतली. सुदैवाने या भूकंपामध्ये कोणतीही जीवितनाही झाली नाही. मात्र, या घटनेनं संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

या भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा गावात असल्याचं सांगितलं जातंय. रिश्टर स्केलवकर मराठवाड्यात झालेल्या भूकंपाची सरासरी ४.५ इतकी नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

या भूकंपामुळे काही ठिकाणी घरांना तडे देखील गेल्याची माहिती आहे. नागरिकांनी अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. यापूर्वीही हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणावले होते. भूगर्भातून मोठे आवाज येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भूकंपाचे धक्के

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या पाचोड परिसरात बुधवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. भूकंपांच्या धक्क्यामुळे छताचे पापुद्रे पडल्याची माहिती आहे. प्रशासनाकडून पाचोड परिसरातील भूकंपाला अद्याप दुजोरा नाही. मात्र भूकंप झाल्याचा दावा नागरिक करीत आहेत.

जालन्यातही जाणवले भूकंपाचे धक्के

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यालाच लागून असलेल्या जालना जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अंबड, घनसावंगी आणि परतुर तालुक्यातील काही गावांमध्ये सकाळी ७.१५ ते ७.१८ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याचे नागरिकांनी सांगितलं आहे.

भूकंपाच्या धक्क्यांनी हिंगोली हादरली

हिंगोली जिल्ह्याला बुधवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के बसले. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद ४.२ इतकी करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू रामेश्वर तांडा गावात असल्याचं बोललं जातंय.

नांदेड जिल्ह्याला भूकंपाचे धक्के

दुसरीकडे नांदेड जिल्ह्यालाही बुधवारी सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. अचानक जमीन हादरू लागल्यामुळे अनेक नागरिक घाबरुन घराबाहेर आले. सुदैवान यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, भूकंपाचे धक्के बसल्याने संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT