रुपेश पाटील
पालघर : पालघर Palghar जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे Earthquake हादरे बसल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी डहाणू Dahanu आणि तलासरी Talasari परिसरात एका मागे एक असे दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. Earthquake in palghar again dahanu and talasari area
गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाच्या धक्याचे सत्र थांबल्याचे जाणवत होते. मात्र, पुन्हा आज हादरे बसण्यास सुरुवात झाल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नोव्हेंबर २०१८ पासून जिह्यातील तलासरी, डहाणू, कासा ,चारोटी, कवाडा Kawada या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहे.
हे देखील पहा-
सकाळी डहाणू आणि तलासरी परिसरात ११ वाजून ५५ मिनिटाला भूकंपाचा पहिला धक्का जाणवल व त्यानंतर पुन्हा ४ मिनिटांनी म्हणजे ११ वाजून ५९ मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला आहे. ३.७ अशी तीव्रता रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरांच्या भीतींना तडे पडले आहे. सुदैवाने अद्याप यामध्ये कोणतीही जीवितहानीचे वृत्त नाही. Earthquake in palghar again dahanu and talasari area
या बाबत भूगर्भीय अभ्यास होत असल्याचे, शासनाने या परिसरातील शासकीय कार्यालय, इमारती, आश्रमशाळा तसेच घरांच्या मजबुती करण्याबाबत निर्देश आधीच दिले आहेत. या धक्क्यानंतर अनेक नागरिकांनी घराबाहेर बऱ्याच काळ थांबणे पसंत केल आहे. या भूकंपामुळे नुकसान झाल्याची माहिती अजूनही पुढे आलेली नाही.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.