Cracked houses and fear of tremors leave Pangarashinde village struggling, as over 200 young men remain unmarried due to earthquake concerns. saam tv
महाराष्ट्र

तरुणांच्या लग्नात भूकंपाचं विघ्न, 200 लग्नाळू तरुणांना मुलगी मिळेना

Hingoli Village Struggles: एखादी नैसर्गिक आपत्ती तरुणांच्या लग्नात विघ्न ठरू शकते, असं तुम्ही कधी ऐकलयं का? हिंगोलीतील एका गावात 200 तरुणांची लग्न होत नाहीयत.... मात्र तरुणांची लग्न न होण्यामागे नेमकं कारण काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

निसर्गाचा कोप कधी माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त करेल याचा नेम नाही. पण हिंगोली जिल्ह्यातल्या एका गावाला निसर्गाच्या अशा संकटाने घेरलंय की, तिथल्या तरुणांचं संसार थाटण्याचं स्वप्नचं अधूर राहिलयं... पांगराशिंदे गावातील तब्बल 200 तरुणांची लग्न रखडली आहेत. आणि त्याला कारण आहे भूकंप...

हिंगोली जिल्ह्यातील पांगराशिंदे हे गाव भूकंपाचे केंद्रबिंदू बनले आहे... 2017 सालापासून आतापर्यंत या गावात 50 पेक्षा अधिक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत...नुकताच म्हणजे 11 एप्रिललाही गावात सकाळी 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला...गावात भूकंपाचे धक्के बसत असल्यानं पांगराशिंदे गावात मुलींचा विवाह करण्यास पालकांचा धजावत नाहीत. त्यामुळे गावात 200 हून अधिक तरुणांचं लग्न जुळत नाही.

दुसरीकडे 11 एप्रिलला झालेला भूकंप 7 वर्षातील सर्वात मोठा भूकंप आहे. भूकंपाच्या धक्क्याने गावातील जुनी मातीची घरं पडल्याचंही पाहायला मिळालंय. या समस्येवर प्रशासनानं ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय...

आधीच पांगराशिंदे मधील ग्रामस्थांना शेतीक्षेत्र कमी आहे. त्यातच सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने गावात नातेसंबंध करण्यासाठी टाळाटाळ होतेय. भूकंपाच्या संकटानं तरुणांचं भविष्य टांगणीला लागलंय. ही सामाजिक समस्या दूर होण्यासाठी सरकार आणि सामाजिक संस्थांकडून काय पाऊल उचलली जातात ? ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीला आलेला पूर ओसरला

अस्सल गावरान स्टाईल चिवळीची भाजी कधी खाल्लीये का? एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा| Chivalichi Bhaji Recipe

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा! पाण्याची चिंता मिटली, ८ दिवसांत धरणातील पाणीसाठा वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT