इस्लामपूर शहरात सुरू झाले 'ई-कचरा' मुक्त अभियान Saam Tv
महाराष्ट्र

इस्लामपूर शहरात सुरू झाले 'ई-कचरा' मुक्त अभियान

"ई-कचरा" ही नव्या युगाची समस्या बनली आहे. मानवी शरीरावर याचे दिवसेंदिवस घातक परिणाम वाढत आहेत.

विजय पाटील

सांगली: "ई-कचरा" ही नव्या युगाची समस्या बनली आहे. मानवी शरीरावर याचे दिवसेंदिवस घातक परिणाम वाढत आहेत. ही बाब लक्षात घेऊन सांगलीच्या इस्लामपूर नगरपालिका, डीएलए संस्था आणि वाळवा इंजिनियर्स असोसिएशनच्या माध्यमातून इस्लामपूर शहर "ई-कचरा मुक्त" करण्यासाठी अभियान" सुरू झाले आहे. 

मानवाच्या भौतिक गरजा वाढत गेल्या, त्यानुसार इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर ही वाढत गेला. मात्र खराब होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची समस्या आता जगासमोर एक आव्हान बनले आहे. या ई-कचऱ्यामुळे मानवी शरीरावर घातक परिणाम सुद्धा होत असल्याची बाब अनेक निष्कर्षामधून समोर आली आहे. ई-कचऱ्याची समस्या आज मोठमोठ्या शहरांपासून अगदी गावपातळीवर पोहोचली आहे. ही बाब लक्षात घेऊन सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर नगरपालिका, डायडॅकिटक्स स्वयंसेवी संस्था आणि वाळवा इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहर "ई-कचरा मुक्त अभियान" हे पाऊल उचलण्यात आले आहे.

शहरातल्या नागरिकांच्या घरात जी खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. त्या पालिकेकडे असणाऱ्या घंटागाडीच्या माध्यमातून संकलित करण्यात येत आहेत. यासाठी इस्लामपूर नगरपालिकेने विशेष गाड्यांची सोय विशिष्ट वेळेत सुरू केली आहे. प्राथमिक स्तरावर या कचरा संकलन याबाबत शहरात जनजागृतीही करण्यात आली. आणि आता प्रत्यक्ष शहरातल्या ई-कचरा उठाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. नगरपालिकेची गाडी प्रत्येक नागरिकांच्या घरासमोर जाते आणि ज्या नागरिकांच्या घरात ई-कचरा अर्थात  इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्यामध्ये टीव्ही, काम्प्युटर ,फ्रिज, मोबाईल किंवा अन्य वस्तू असतील ते संकलित केले जात आहेत. नागरिकांचाही याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

इस्लामपूर नगरपालिकेच्या घंटागाडी आणि डीएलए स्वयंसेवी व वाळवा तालुका इंजिनिअर्स असोसिएशनच्या सभासदांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा संकलित केला जात आहे. 15 ऑगस्ट रोजी संकलित केलेला ई- कचरा पुण्याच्या पूर्णम इकोव्हिजन या संस्थेकडे पाठवला जाणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून ज्या वस्तू दुरुस्त होतील. त्या गरजू लोकांना देण्यात येणार आहेत. इतर वस्तु या शास्त्रीय पद्धतीने विघटन केल्या जाणार आहेत. एकूणच आजच्या ई-कचऱ्याच्या निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठी उचलले पाऊल हे नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, २७ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Chocolate Waffle Recipe : बिस्किटांपासून बनवा चॉकलेट वॉफल, लहान मुलांचा आवडता पदार्थ १० मिनिटांत तयार

10 Hour Work Rule: सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! १० तासांची शिफ्ट, ५ दिवसांचा आठवडा

SCROLL FOR NEXT