Akola Police Busted Fake Currency Racket file pic ht
महाराष्ट्र

Fake Notes:निवडणुकीत मिळालेल्या नोटा बोगस? पोलिसांकडून नकली नोटांचं रॅकेट उद्धवस्त

Akola Police Busted Fake Currency Racket: राज्यात यंदा निवडणुकांमध्ये पैशांचा महापूर आला होता. आता निवडणुका संपल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

अनेक ठिकाणी बनावट नोटा वाटल्या की काय असा संशय आता व्यक्त केला जातोय. कारण अकोल्यात पोलिसांना कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटांची थप्पीच सापडलीय. तर दुसरीकडे पंढरपुरातही लाखो रुपयांच्या बोगस नोटा आढळून आल्या आहेत.नेमका काय आहे प्रकार त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

ही नोटांची थप्पी पाहा,शंभर, दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नोटा या आयकर विभागाने छापा मारून पकडलेल्या नाहीत. तर ही आहे बनावट नोटांची थप्पी. होय. पोलिसांनी अकोल्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत बनावट नोटांचं रॅकेट उघड केलंय.त्याचं झालं असं की पोलिसांना काही सजग नागरिकांकडून बनावट नोटांबाबत माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी एका संशयितामागे आपला ससेमिरा लावला आणि या संशयित व्यक्तीला रंगेहात पकडलं. त्यानंतर बनावट नोटांचा कारखानाच पोलिसांच्या हाती लागला. या ठिकाणी पोलिसा गेले असता थेट नोटांची थप्पीच पोलिसांना आढळून आली. यंदा निवडणुकीच्या काळात राज्यात सगळीकडेच पैशांचा पाऊस पडत होता. अकोलाही या नोटांच्या पावसात भिजल्याचा संशय आता पोलिसांना आहे.

कारण या बनावट नोटा निवडणुकीत वाटण्यासाठी आणल्याचा संशय पोलिसांना आहे. निवडणूक आटोपल्यानंतर या बनावट नोटा फेकून देण्यात आल्याचा अंदाज आहे. एक कोटीपेक्षा जास्त रक्कम असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे एखाद्या सिनेमालाही लाजवेल असंच दृश्य पोलिसांच्या तपासातून याठिकाणी समोर आलंय. या बंडलमधल्या वरच्या काही नोटा खऱ्या आहेत तर खाली सगळ्या नोटा बनावट आहेत.

हे केवळ अकोल्यातच नव्हे तर पंढरपूरमध्येही बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.इथं मधुकर माने यांना गाईच्या गोठ्याच्या अनुदानाची १० लाख १४ हजार ५०० रूपयांची रक्कम एजंटनं दिली. त्यात पाचशे रुपयांच्या २०२९ नोटा होत्या. ही रक्कम मधुकर माने बँकेत भरण्यासाठी गेले. आणि याठिकाणी या बनावट नोटांचं बिंग फुटलं.

मानेंनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर त्यांना पैसे देणारे एजंट राजू चोरमले आणि अतुल तावरे या दोघांना पोलिसांनी अटक केलीय.या दोघा एजंटकडे ही रक्कम नेमकी निवडणुकीत वाटलेल्या पैशांमधूनच आली की आणखी कुठून याचा तपास करणं गरजेचं आहे. विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईत तब्बल 660 कोटी 18 लाखांची रक्कम जप्त केली.

मात्र निवडणूक संपताच बनावट नोटांचं मोठं रॅकेट राज्यभरात उघड होत आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला तर चुना लावला जातोय....मात्र या बनावट नोटांमुळे मतदारांचीही मोठी फसवणूक झाल्याचं समोर आलंय. मात्र पैसे वाटणारे नेते आणि घेणाऱ्या मतदारांमध्ये तेरी भी चूप मेरी भी चूप असाच काहीसा प्रकार झाल्याचं दिसतंय. मात्र राज्यातल्या या बनावट नोटाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT