राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण गेले - टिळेकर
राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण गेले - टिळेकर  दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण गेले - टिळेकर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दीपक क्षीरसागर

लातूर : राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन वंचित घटकांना आरक्षण देऊन न्याय दिला आणि मुख्य प्रवाहात आणलं. 26 जूनला राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे. हा दिवस देशभर आपण सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करतो. याच दिवशी आम्ही ओबीसी समाजाच्या वतीने राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी लातूर येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. Due to the refusal of the state government, the reservation of OBC has gone - Tilekar

हे देखील पहा -

राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण गेले आहे. ते पूर्ववत होण्यासाठी आम्ही राज्यभर हजारो ठिकाणी आक्रोश आंदोलन करणार आहोत. मागील तीन चार दिवसांपासून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत ओबीसी नेत्यांच्या बैठक सुरु आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांचा सहभाग होता.

राज्यसरकारने ओबीसी आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका सादर करावी आणि नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून ओबीसी समाजाची माहिती गोळा करून सुप्रीम कोर्टात सादर करावी यासाठी राज्यभर ओबीसी समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spruha Joshi : स्पृहा जोशीचं बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण, 'या' वेबसीरीजमध्ये साकारली प्रमुख भूमिका

Narayan Rane : सत्ता गेल्याने त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय; नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

MI vs KKR, Toss Prediction: टॉस ठरेल बॉस! KKR ला हरवण्यासाठी मुंबईने आधी काय करावं?

Today's Marathi News Live : राहुल गांधी यांच्या पुण्यातील सभेच्या वेळेत बदल, सभास्थळी ६.३० वाजता येणार

Share Market Today : शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १४०० अंकानी घसरला, झटक्यात गुंतवणूकदारांचे ३ कोटी बुडाले

SCROLL FOR NEXT