परभणीत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होऊन किंमती वाढल्या, नागरिक हैराण राजेश काटकर
महाराष्ट्र

परभणीत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होऊन किंमती वाढल्या, नागरिक हैराण

गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने परभणी जिल्हातील 10 हजार हेक्टर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी भाज्याची आवक कमी होऊन भाववाढ झाली आहे.

राजेश काटकर

परभणी - जिल्ह्यात पावसाचा हाहाकार झाला असून जिल्ह्यातील 31 महसुल मंडळात अतिवृष्टी झाली आहे, तर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी पावसाची सरासरी 70 मिमी पाऊस नोंद झाली आहे. या पावसाची नोंद सर्वाधिक 95.5 मिमी सिंगापूर मंडळात झाली असून पावसाने एकूण 242 गावांना अतिवृष्टीचा फटका आहे. मागील 10 दिवसांत 33 हजार 237 हेक्टरवरील जिरायती तर 600 हेक्टररील बागायती व 90 हेक्टरवरील फळ पिकांचे नुकसान झाले असून जून ते आजपर्यंत 882 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. (Due to heavy rains in Parbhani, crops have been damaged and prices have gone up)

हे देखील पहा -

गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने जिल्हातील 10 हजार हेक्टर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले, परिणामी भाज्याची आवक कमी होत भाववाढ झाली. गेल्या महिन्यात मिळत असलेले वांगी 40 रुपये किलो होती ती 60 रुपये किलो तर दोडकी 20 रुपये किलो ती 40 रुपये झाली. टमाटे 25 रुपये किलोची 40 रुपये झाली तर पालेभाज्या जुडी मागे 10 रुपयांची वाढ झाली. रोजच्या जेवणातील कोथिंबीर ही आठ दिवसांपासून मिळणे दुरापास्त झाली असून कोथिंबीर 50 रुपये किलो मिळत होती ती 100 रुपये किलो झाली आहे. भाजीपाला वाढल्याने सर्वसामान्याचे बजेट कोलमडले आहे.

अगोदरचे भाव (किलो मध्ये) आताचे भाव (किलो मध्ये)

1) वांगी 40 रुपये किलो 60 रुपये किलो

2) दोडकी 30 रुपये किलो 50 रुपये किलो

3) गोबी 20 रुपये किलो 40 रुपये किलो

4) टमाटे 25 रुपये किलो 40 रुपये किलो

5) कोथिंबीर 50 रुपये किलो 100 रुपये किलो

6) पालेभाज्या 10 रुपये जोडी 20 रुपये किलो

7) मिरची 50 रुपये किलो 80 रुपये किलो

8) वाल शेंग 20 रुपये किलो 40 रुपये किलो

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT