Palghar News Saam Tv
महाराष्ट्र

Palghar : मद्यपी शिक्षकाची सरपंचाला मारहाण; काय आहे संपूर्ण प्रकरण?

मारहाण करणाऱ्या मुजोर शिक्षकावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रुपेश पाटील

Palghar News - पालघर (Palghar) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका मद्यपी शिक्षकाने सरपंचालाच बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जिल्हा परिषद शाळेच्या काही समस्या आहेत का हे विचारायला शाळेत गेलेल्या सरपंचालाच जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. डहाणू तालुक्यातील धामणगाव आफठोल पाडा या जिल्हा परिषद शाळेत घडली आहे.

जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षणाची मोठी दुरावस्था झाली आहे. त्यातच शिक्षण विभागाचे याकडे लक्ष नसल्याने सरपंच दिनेश वरखंडे हे जाब विचारण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत गेले होते. त्यावेळी हे संपूर्ण प्रकरण घडलं.

वसंत ठाकरे असं मद्यपी असलेला जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचे नाव असून त्याने सरपंच दिनेश वरखंडे यांनी जाब विचारतात त्यांना नशेत असलेल्या शिक्षकाने कानसलित लगावली. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षणाची मोठी दुरावस्था असून जिल्हा शिक्षण विभागाचा या बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने सामाजिक कार्यातून जाब विचारत जाणाऱ्या लोकप्रतिनिधींना मुजोर शिक्षकांकडून मारहाण होत असेल तर शिक्षण विभाग झोपेत आहे का असा सवाल येथे निर्माण झाला आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाला जाग येऊन मारहाण करणाऱ्या मुजोर शिक्षकावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ईश्वरपुरात बलात्कारी राक्षस, सामुहिक अत्याचारानंतर नग्न धिंड

एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना जबरा धक्का! ऐन निवडणुकीत मनसेच्या प्रमुख शिलेदारांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश

Winter Clothing Color: थंडीत कोणत्या रंगाचे कपडे वापरले पाहिजेत आणि का?

भाजपचं सरकार संकटात; काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव

ऑपरेशन लोटसचा काँग्रेसला धक्का, प्रज्ञा सातवांचा गॉडफादर कोण?

SCROLL FOR NEXT