Nandurbar Drought 
महाराष्ट्र

Nandurbar Drought: यंदा नंदूरबार जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती; जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३५ टक्के कमी पाऊस

Nandurbar News: शहादा तालुकादेखील दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी केली जात आहे.

Bharat Jadhav, नंदुरबार दिनू गावित

(सागर निकवाडे , नंदूरबार)

Nandurbar Drought:

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांवर मोठ संकट ओढावलं आहे. शहरी भागातदेखील पिण्याच्या पाण्याचे संकट उद्भवणार आहे. जिल्ह्यातील नंदुरबार शहर, शहादा आणि तळोदा या तालुक्यात सर्वाधिक कमी पाऊस पडला आहे. मात्र शासनाने फक्त नंदुरबार तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केलाय, त्यामुळे शहादा तालुकादेखील दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे. (Latest News)

यावर्षी नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३० ते ३५ टक्के कमी पाऊस पडलाय. यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम पूर्णतः वाया गेलाय. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता होती. परंतु जे पीकं जगली होती, त्यावर रोगराई पसरल्यामुळे आणखीन नुकसान वाढलंय. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठा खर्च केला होता, परंतु खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर शासनाकडून फक्त नंदुरबार तालुका दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे शहादात देखील सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने शहादा तालुका देखील दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी भारत राष्ट्र समिती पक्षाने केलीय. सरकार आपल्या निकषाप्रमाणे दुष्काळ जाहीर करत असते. मात्र शहादा तालुक्यात पावसाने मोठा खंड पडला होता, त्यामुळे पिकांवर रोगराई पसरली.

परंतु शासनाने शहादा तालुक्यातील दहा मंडळापैकी ८ मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, त्यामुळे शासनाने आपले निकषात बदल करून शेतकऱ्यांसाठी दुष्काळ जाहीर करावा. निकषात बदल करून विद्यार्थ्यांची परीक्षा फीदेखील माफ होईल यादृष्टीने लवकर दुष्काळ जाहीर करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

सरकारी बाबू कागदांवर अवलंबून राहून शासनाकडे अहवाल पाठवत असतात मात्र सत्य परिस्थिती शेतकऱ्यांच्या शेतात आहे ,त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी शेतीत समक्ष येऊन पहावे आणि दुष्काळ जाहीर करावा अन्यथा शेतकऱ्यांवरील संकट कमी होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'आप'चे आणखी २ खासदार भाजपच्या संपर्कात, मुख्यमंत्र्यांची खुर्ची संकटात; पडद्यामागं काय घडतंय?

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान खात्याने काय अंदाज दिला?

India Tourism : डोंगरमाथा, खडकाळ परिसर; प्राचीन इतिहासाची साक्ष देणारा 'हा' किल्ला खूप कमी लोकांना माहितेय

Bigg Boss Marathi 6 Winner : "माझ्या हातात ही ट्रॉफी..."; 'बिग बॉस मराठी ६' ची विजेती तन्वी कोलतेची नवीन पोस्ट चर्चेत | VIDEO

SCROLL FOR NEXT