Nitin Gadkari Saam TV
महाराष्ट्र

Nitin Gadkari : ड्रायव्हिंगबाबत लवकरच येतोय कडक नियम; नितीन गडकरींनी नेमकं काय सांगितलं?

Petrol Diesel News : देशातून पेट्रोल आणि डिझेल संपवण्याचा मी संकल्प केला असल्याचे नितीन गडकरी यांनी केला आहे.

Namdeo Kumbhar

Nitin Gadkari on Petrol Diesel : पेट्रोल डिझेल संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलेय. अमरावती येथील ड्रायव्हिंग स्कूलच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. देशातून पेट्रोल आणि डिझेल संपवण्याचा मी संकल्प केला असल्याचे नितीन गडकरी यांनी केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी रस्ते अपघातामध्ये दरवर्षी मृत्यू पावणाऱ्यांबद्दल आणि त्याच्याबाबतच्या कारणावरही त्यांनी भाष्य केले.

काय म्हणाले गडकरी ?

भारतामधून येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेल हद्दपार करणार आहे. तसा मी संकल्प केला आहे. येणाऱ्या काळात वाहतूक पद्धतीत ही बदलत जाणार आहे. मेळघाटसारख्या परिसरात ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर सुरू होणं गरजेचे आहे... देशात ड्रायव्हरची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. येणाऱ्या काळात ड्रायव्हरने फक्त आठ तास ड्रायव्हिंग करावे असा नियम करणार असल्याचेही यावेळी गडकरी म्हणाले.

भारत पहिल्या क्रमांकावर जाणार -

आपल्या देशात साडेचार कोटी रोजगार देणारी ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. यामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. येणाऱ्या काळात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये भारत जगात पहिला क्रमांकावर जाईल, असा विश्वास गडकरींनी यावेळी व्यक्त केला.

देशात शेतकऱ्यांना समृद्ध करण्याकरता इथेनॉल पॉलिसी आणली, ही इकॉनॉमी दोन लाख कोटींवर पोहोचली आहे.

येणाऱ्या काळात ट्रान्सपोर्ट सेक्टर बदलत चालले असून इलेक्ट्रिक व्हेईकल व इथून वर चालणारे वाहन रस्त्यावर धाव लागतील.

ज्यावेळी मुंबई-पुणे महामार्ग बांधण्याची मला संधी मिळाली. दोन तासांत जाता येईल, असे सांगितले होते. त्यावर माझी खिल्ली उडवली गेली. पण तुम्ही वास्तव पाहत आहात. लोक दोन तासांत मुंबईवरुन पुण्याला जाऊ शकता. देशात आशाप्रकारचे अनेक रस्ते तयार केले आहेत. काश्मीर ते कन्याकुमारी हा रस्ता तयार केलाय. त्यामध्ये जोडरस्ते तयार केले आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांना याचा फायदा होणार आहे.

भारतामध्ये लवकरच 400 इथेनॉल पंप सुरू करण्याची योजना आहे. इथेनॉल वापरामुळे ट्रान्सपोर्ट स्वस्त होईल, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

येणाऱ्या काळात वाहन चालकांना व्यवस्थित परीक्षा घेऊन त्यांना लायसन देण्यात यावं, लायसन देण्यात फ्रॉड होऊ नये एका ड्रायव्हरवर अनेकांचं जीवन अवलंबून असते, असेही गडकरी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stroke warning signs: स्ट्रोक येण्यापूर्वी तुमच्या शरीरात होतात 'हे' ६ बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Viral Video: 'सरपंच खाली उतरला...', विद्यार्थ्यांनी अडवला रस्ता; चिखलफेक करत.. व्हिडिओ व्हायरल

Tejswini Pandit: दिलखुलास हसणारी...; आईच्या निधनानंतर लेक तेजस्विनी पंडीतची पहिली भावनिक पोस्ट

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात 14 मंडळात अतिवृष्टी, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT