Nashik Shivshahi Bus Driver End Live Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Bus Driver End Life: नाशिकला जाणाऱ्या शिवशाही बसमध्ये बिघाड, चालकाने टोकाचं पाऊल उचलत संपवलं जीवन

Nashik Police: बस चालक राजू ठुबे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Priya More

Nashik News: नाशिकमध्ये शिवशाही बसमध्ये (Shivshahi Bus) चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या सिन्निर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर (Sinnir-Shirdi National Highway) पांगरी येथे ही घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू हिरामण ठुबे (49 वर्षे) असं आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. राजू ठुबे हे नाशिकच्या दोनवाडे येथे राहत होते. ते राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगार क्रमांक एकमध्ये कार्यरत होते. बुधवारी ते शिर्डी येथून नाशिकला शिवशाही बस घेऊन जात होते. दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास पांगरी शिवारात बसमध्ये बिघाड झाला. त्यामुळे त्यांनी ही बस रस्त्याच्या कडेला लावली.

या बसमधील प्रवाशांना पाठीमागून येणाऱ्या बसमध्ये बसवून दिल्यानंतर चालक ठुबे यांनी सिन्नर आगाराला माहिती देऊन दुरुस्ती पथक पाठवण्याची विनंती केली होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत सिन्नर येथील दुरुस्ती पथक न आल्यामुळे त्यांच्यासोबत असलेली महिला चालक देखील निघून गेली. त्यामुळे बससोबत चालक ठुबे एकटेच होते. रात्री सव्वा ते दीड वाजण्याच्या सुमारास सिन्नर येथील दुरुस्ती पथक बसजवळ आले. आवाज देऊनही चालक ठुबे यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पथकातील कर्मचारी बसमध्ये चढले.

अंधार असल्याने या पथकातील एकाने मोबाईलची टॉर्च लावून बसमध्ये तपासणी केली. त्यावेळी त्यांना बसच्या शेवटच्या सीटजवळ बस चालक ठुबे यांचा मृतदेह लटकलेला अवस्थेत आढळून आला. कमरेच्या करदोऱ्याच्या सहाय्याने त्याने आत्महत्या केली. छताकडच्या एअर विंडोच्या हुकला अडकवून घेत चालक ठुबे यांनी आत्महत्या केली होती. ठुबे यांचा मृतदेह पाहून दुरुस्ती पथकातील सर्वजण खूप घाबरले.

दुरुस्ती पथकातील कर्मचाऱ्यांनी लगेच सिन्नर आगारात आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ठुबे यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी नाशिकच्या वावी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बस चालक राजू ठुबे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

दरम्यान, सिन्नर आगारातील दुरुस्ती पथक सकाळपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी नादुरुस्त असलेल्या बसच्या दुरुस्तीमध्ये व्यस्त होते. त्यामुळे शिवशाही बस दुरुस्त करण्यासाठी त्यांना यायला रात्री उशीर झाला. यादरम्यान चालक ठुबे यांनी नैराश्येत येऊन आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला की आणखी काही कारण आहे याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. ठुबे यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

Maharashtra News Live Updates: सोलापुरात आदिवासी भटके विमुक्त समाजाकडून भाजप उमेदवाराला पाठिंबा

Numerology: या तारखेला जन्मलेली व्यक्ती असते श्रीमंत, राजसारखे आयुष्य जगते

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

SCROLL FOR NEXT