नंदुरबार : जिल्ह्यातील अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली होती यामागील कारणांची शहानिशा केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील (P.R. Patil ) यांनी ड्रंक अँड ड्राइव्ह (Drink and Drive) विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेमुऴे जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली असल्याने मद्यपी वाहन चालकांमुळे अपघात (Accident) होत असल्याने पोलिसांनी आता दारु पिऊन गाडी चालविण्याऱ्यांविरोधात कारवाईचे अस्त्र उगारले आहे.
हे देखील पहा -
नंदुरबार जिल्ह्यात 115 वाहनचालकांवर 'ड्रंक अँड ड्राईव्ह' कारवाई केली आहे, त्यांचे वाहन परवानाही रद्द करण्याची कारवाई सुरू किल्ल्याची माहिती पोलीस अधीक्षक पी. आर पाटील यांनी दिली आहे. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने सुरू असलेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विना नंबर प्लेट व फॅन्सी नंबर प्लेट वाहनांवर देखील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.