Aurangabad Crime: दारू पिऊन रोज मारहाण करणाऱ्या भावाचा भावानेच केला खून Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime: दारू पिऊन रोज मारहाण करणाऱ्या भावाचा भावानेच केला खून

दारू पिऊन येतो म्हणून मित्राच्या सहाय्याने भावानेच भावाचा गळा घोटून खून केला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अविनाश कानडजे

औरंगाबाद : दारू पिऊन येतो म्हणून मित्राच्या सहाय्याने भावानेच भावाचा गळा घोटून खून केला आहे. हा धक्कादायक प्रकार औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील सिल्लोड (Sillod) शहरात उघडकीस आला आहे. 1 जानेवारी रोजी वाळूज (Waluj) औद्योगिक परिसरात एका पडक्या वाड्यात मृतदेह सापडला होता. तेव्हापासूनच या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस (Police) करत होते. मात्र आता या प्रकरणाचा छडा लागला असून, भावानेच मित्राच्या (friend) सहाय्याने आपल्या भावाचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

हे देखील पहा-

विशेष म्हणजे खून केलेल्या भावानेच आपल्या बहिणीला आपण खून केल्याचे कबूल केले, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. अमोल रोहिदास वानखेडे असे मृताचे नाव आहे. सिल्लोड पोलिस ठाण्यात आईने दिलेल्या तक्रारीनुसार, मयताचा भाऊ गणेश रोहिदास वानखेडे आणि मित्र सुमित विजय सुतार यांना सिल्लोड पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक (Arrested) केली आहे. तर खूनामध्ये सामील असलेला तिसरा आरोपी हा फरार आहे. मयत अमोलला दारूचे व्यसन लागले होते. त्यामुळे तो दररोज दारू पिऊन आई आणि भावाला तसेच कुटुंबातील लोकांना त्रास देत होता.

या घटनेला कंटाळून गणेशने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने शहरातील हनुमान नगर येथील घरातच आपल्या सख्ख्या भावाचा गळा आवळून खून केला आहे. ही घटना 7 डिसेंबर रोजी घडली होती. तर एक जानेवारी रोजी एमआयडीसी वाळूज पोलिसांना बेवारस स्थितीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, आता भावनेच आपल्या बहिणी जवळ भावाला मारल्याची कबुली दिल्यामुळे या खुनाचे गुढ उघडले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

Tharवाल्याचा विकृतपणा! आधी कट मारला, नंतर रिव्हर्स घेत वृद्धाच्या अंगावर घातली भरधाव कार|Video Viral

Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT