Kalicharan Maharaj Arrested: कालीचरन महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये आणि शिवराळ भाषा वापरणारा कालीचरण महाराज याला अखेर अटक करण्यात आले.
Kalicharan Maharaj Arrested: कालीचरन महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात
Kalicharan Maharaj Arrested: कालीचरन महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यातSaam TV
Published On

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये आणि शिवराळ भाषा वापरणारा कालीचरण महाराज (kalicharan maharaj arrested) याला अखेर अटक (Arrested) करण्यात आले होते. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) रायपूर पोलिसांनी (police) ही कारवाई केली आहे. कालीचरण महाराज यास खडक (khadak) पोलिसांनी छत्तीसगढमधील रायपुर (Raipur) येथून बुधवारी सकाळी ताब्यात घेतले आहे. खडक पोलिसांचे पथक कालीचरण यास घेऊन पुण्याला (Pune) निघाले असून दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत त्यास पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे.

हे देखील पहा-

कालीचरण महाराजाविरोधात तिक्रपरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यानुसार पोलिसांनी कारवाई करत कालीचरण महाराजला (kalicharan maharaj) मध्यप्रदेशमधील खजुराहोमधून ताब्यात घेतले होते. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल धर्मसंसदेत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजला अटक करण्यात आली आहे. छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी ही कारवाई केली असून याबाबत तिक्रपरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Kalicharan Maharaj Arrested: कालीचरन महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात
Corona In India: गेल्या 24 तासात देशात 58 हजार 97 कोरोना रुग्णांची नोंद, तर 534 जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशमधील खजुराहो येथून महाराजाला अटक करण्यात आलंय.

कालीचरण महाराज महाराष्ट्रातील अकोला येथील असल्याचे समजते. त्यांनी मोहनदास करमचंद गांधी यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली होती. त्यातले काही शब्द तर इथे लिहिलेही जाऊ शकत नाही. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत कालीचरण महाराजानं गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानले आहेत. त्याच्या कृतीचं अभिनंदन केलंय. देशभरात सध्या विविध ठिकाणी धर्मसंसदेचं आयोजन केलं जातंय. त्यातली छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये जी धर्मसंसद पार पडली, त्यात कालीचरण महाराजानं हे तारे तोडले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com