सध्याची तरुणाई ही विचारांनी समृद्ध आहे. तरुण पिढी उज्वल भविष्याचा आधार मानली जाते. परंतु हीच तरुणाई काही प्रमाणात व्यसनाच्या अधीन झाली आहे. त्यामुळे देशाचे भविष्य कुठेतरी अंधारात जाताना दिसत आहे. याच पिढील पुन्हा चांगल्या मार्गाला वळवण्याचे काम डॉ सोमनाथ गिते करत आहे.
भारत हा सर्वात जास्त तरुण पिढी असलेला देश आहे. देशातील तरुण पिढीकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहे. या तरुण पिढीला योग्य मार्ग दाखवण्यासाठी अनेक लोक काम करत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे सोमनाथ गिते.
सोमनाथ गिते यांनी व्यसनमुक्ती करण्यासाठी जनजागृती केली आहे. डॉ सोमनाथ गितेंच्या कामामुळे आज कित्येक तरुण मुलं व्यसनापासून लांब गेले आहेत. डॉ सोमनाथ गिते यांच्या कामाची दखल 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'युनिक वर्ल्ड रेकॉर्डने' घेतली आहे.
व्यसनमुक्ती विषयावर अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याचा गौरव 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड २०२३' आणि 'युनिक वर्ल्ड रेकॉर्ड' या संस्थांनी घेतली आहे. INDIA'S WORLD RECORDS मध्ये अगोदरच त्यांच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे.
समुपदेशन, वर्तमानपत्रं, मासिक, सोशल माध्यमांतून जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे काम डॉ. सोमनाथ गिते यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले असून यापूर्वी त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाची आणि या क्षेत्रातील त्यांनी केलेल्या अभ्यासाची दखल घेत विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंटकडून डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. तसेच, 'व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार २०२२' 'राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२२', 'राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२२' असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डॉ. मुक्ता पुणतांबेकर, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, स्व. मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, वर्षा विद्या विलास यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.