सोलापूरचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणात आरोपी मनीषा मुसळे माने हिला कोर्टात हजर करण्यात आले. सुसाईड नोटमध्ये तिचा उल्लेख होता.
सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेला सोलापूर कोर्टात हजर करण्यात आले. तिला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आरोपी महिला मनीषा मुसळे-माने हिला सदर बाजार पोलीस स्टेशनचे पथक लॉकअपधून कोर्टाकडे घेऊन गेले.
वळसंगकर यांच्या हत्येप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात पोलीस कोठडी मागण्यासाठी आरोपी महिलेला हजर करण्यात आले.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिट्ठीत मनीषा मुसळे-माने हिच्या नावाचा उल्लेख होता.
त्याच चिट्ठीवरून डॉ. शिरीष वळसंगकर यांचा मुलगा डॉ. आश्विन याने पोलिसात फिर्याद दिली होती.
शनिवारी रात्री ११ वाजता सदर बाजार पोलीसांनी आरोपी महिला मनीषा मुसळे-माने हिला अटक केली. आज तिला कोर्टात हजर करण्यात आले आहे.