Crime New
Crime New Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad Crime : औरंगाबाद शहरातील 'डबल मर्डरचा' काही तासांत उलगडा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया

औरंगाबाद - गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद (Aurangabad) शहरात खुनाच्या घटना वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवाळीत एकामागून एक असे तीन खुनाच्या घटना समोर आल्या होत्या. त्यातच काल आता पुन्हा एकदा एकाचवेळी दोघांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात शहर पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली. अखेर पोलिसांच्या या तपासला यश आले आहे. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे.

औरंगाबाद शहरातील वर्दळीच्या घाटी रुग्णालयासमोरील रस्त्यावर काल सकाळी दोन खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने औरंगाबाद शहरात एकच खळबळ उडाली होती. यामध्ये एकाचा गळा आवळून तर दुसऱ्याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्र फिरवत घटनेनंतर अवघ्या काही तासांतच आरोपीला अटक केली आहे.

शेख वजीर शेख बशीर असे आरोपीचे नाव आहे. आपण संपविलेले दोन मित्र जिवंत आहेत की त्यांचा मृत्यू झाला हे बघायला आरोपी घटनास्थळी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

सिडको आणि नारेगाव परिसरात दोन तरुणांची हत्या

काही दिवसापूर्वीच शहरातील सिडको आणि नारेगाव परिसरात दोन तरुणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर आता शहरातील नेहमी वर्दळीचं ठिकाण असलेल्या घाटी रुग्णालय परिसरात दोन जणांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांना या घटनेतील आरोपीला पकडण्यात यश आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya Statement: 'मी स्वत:ला भाग्यवान समजतो..' मुंबईच्या विजयानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

Utkarasha Rupvate Car Attack | वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवतेंच्या गाडीवर दगडफेक

Beed Constituency: पंकजा मुंडे, बजरंग सोनवणेंना नोटीस, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 48 तासांमध्ये मागवला खुलासा; जाणून घ्या कारण

Live Breaking News : पालघरचे खासदार राजेंद्र गावित घरवापसी करणार

Sanjay Raut News: महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव शक्य नाही; सुप्रिया सुळे विक्रमी मताने जिंकतील... संजय राऊतांना विश्वास

SCROLL FOR NEXT