chandrahar patil  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार: पैलवान चंद्रहार पाटील यांनी घेतला मोठा निर्णय

chandrhar patil latest news: डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधत असतांना मोठी घोषणा केली आहे,येत्या दोन दिवसांत कुस्तीगीर परिषदेला भेटून...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

यंदाची २०२५ महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहमदनगरमध्ये मोठ्या उत्साहात चालू असताना शेवटच्या दिवशी या स्पर्धेला गालबोट लागले. गादी विभागातील अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर पैलवान शिवराज राक्षेने मोठा राडा घातला होता. पंचाचा निर्णय अमान्य करत शिवराज राक्षेने आखाड्यातच पंचाची कॉलर पकडत त्यांना लाथ मारली. या प्रकरणानंतर कुस्ती परिषदेकडून शिवराज राक्षेवर तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. या राड्याचे राज्यभरात पडसाद उमटलेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गोंधळावरून महाराष्ट्राचा डबल केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठा निर्णय घेतलाय.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील राड्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी आता आपल्याला मिळालेल्या दोन्ही चांदीच्या गदा परत देण्याचा निर्णय घेतला आहे. जे यावेळी शिवराजसोबत घडले ते माझ्यासोबत देखील घडले आहे. त्यामुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले. जर माझ्या पराभवाच्या गोष्टी मान्य केल्या तर, त्याचं मला समाधान वाटेल, तसं होणार नसेल तर येत्या दोन दिवसात मला मिळालेल्या चांदीच्या गदा कुस्तीगीर परिषदेला परत करणार असल्याचं पैलवान चंद्रहार पाटील यांनी जाहीर केले.

'त्या' पंचाला लाथ नाही गोळ्या घाला

शिवराज राक्षेने त्या पंचाला लाथ नाही तर गोळ्या घातल्या पाहिजे होत्या, असे वादग्रस्त विधान ठाकरे सेनेचे नेते व डबल महाराष्ट्र केसरी पै चंद्रहार पाटील यांनी केले. तर शिवराजच्या कुस्तीत फिक्सिंग झाली असून त्या पंचावर देखील कुस्ती संघांनी कारवाई करावी, अशी मागणी शिवराज राक्षेच्या कुटुंबियानी केली आहे.

अहमदनगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या सामन्यात पैलवान पृथ्वीराजचा विजय झाला. यावर चंद्रहार पाटील म्हणाले की, पहिल्यांदा तर मी पृथ्वीराजचे अभिनंदन करतो. त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही. पंचाचा निर्णय वादग्रस्त आहे. त्यामुळे शिवराजने लाथ मारून चूक केली. खरं तर त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या. मी पण २००९ साली महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळत असताना या निर्णायाला बळी पडलो होतो. त्यावेळी मी आत्महत्या करणार होतो. पंचाच्या एका निर्णयामुळे खेळाडूचे करिअर अडचणीत येते. हे मी अनुभवले आहे. त्यामुळे मी माझ्या मताविषयी ठाम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT