GBS Syndrome Disease Patient In Solapur  Saam Tv
महाराष्ट्र

GBS Syndrome : GBS ला घाबरून जाऊ नका, हाऊस टू हाऊस सर्वे करणार, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. रुग्णांचे सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठवण्यात येतायत.

Surabhi Jayashree Jagdish

विश्वभूषण लिमये, साम प्रतिनिधी

पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम थैमान घातलं असून आता सोलापूरात देखील याचे रूग्ण आढळून येतायत. आतापर्यंत सोलापूरात याचे ५ रूग्ण आढळून आले आहेत. रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. रुग्णांचे सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठवण्यात येतायत.

दरम्यान यासंदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, सोलापुरात 5 रुग्ण आढळून आले आहेत. लोकांमध्ये काही गैरसमज आहेत. GBS आजार हा संसर्गजन्य नाहीये त्यामुळे घाबरून जाऊ नका. GBS मध्ये दूषित पेशी ह्या नर्व्हस सिस्टीमवर अटॅक करतात.

जुलाब आणि उलट्या झाल्याने पायातील शक्ती गेली तर ही त्याची लक्षणं आहेत. सर्दी पडसं झाल्यानंतर हात पायातील शक्ती जाऊन गिळायला त्रास होणं आणि दम लागणं, हातापायाला मुंग्या येणं या तक्रारी जाणवू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमधून औषध घेऊ नका, असंही त्यांनी म्हटलंय.

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी 2 करोड रुपये या आजाराच्या औषधंसाठी दिले आहेत. 5 वर्षापर्यंतची मुलं आणि 60 वर्षाच्या पुढील वयोमानाच्या लोकांमध्ये हा आजार प्रामुख्याने जाणवतो. सध्या मोठ्यांसाठी 10 आणि लहान मुलांसाठी 5 व्हेटिलेटर आरक्षित ठेवले असून वेगळा वॉर्ड सोलापुरात अद्याप निर्माण केलेला नाहीये.

याशिवाय येत्या 30 तारखेपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात हाऊस टू हाऊस सर्वे करायला सुरुवात करणार आहोत, असंही कुमार आशीर्वाद यांनी सांगितलंय.

या आजाराबाबत काळजी घेण्यासाठी सोलापूरच्या मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर म्हणाले की, बिस्लरी पाणी किंवा पाणी गरम करून प्यावं. व्यवस्थित शिजलेलं अन्न खावं. हा आजार 100 % बरा होतो,घाबरून जाऊ नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA News : मुंबईत गाळ्यांच्या भाड्यात तब्बल १२१ कोटींची फसवणूक; म्हाडाने १० जणांविरोधात केली कारवाई

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

SCROLL FOR NEXT