donkey milk gets 20 thousand rupees per litre in latur  saam tv
महाराष्ट्र

Donkey Milk : गाढविणीचे दूधाचा लिटरला 20 हजार भाव, गुणधर्माबाबत पशुसंवर्धन विभागाने स्पष्टच सांगितलं

गाढवाच्या दुधात आयुर्वेदिक गुणधर्म आहेत असे सांगितले जात आहेत.

Siddharth Latkar

- संदिप भोसले

Latur News :

लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी गावात चक्क गाढविणीच्या दुधाला 20 हजार रुपये लिटरचा भाव मिळत आहे.एक महिला आपल्या हातात गाढव घेऊन चक्क ओरडत दुधाची विक्री करताना पाहायला मिळत आहे. या गाढविणीच्या दुधामुळे (Donkey Milk) दुर्धर आजार बरे होतात असे महिलेकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान महिलेच्या दाव्याबाबत वैज्ञानिक दृष्टीने जुनाट दुर्धर आजार बरे होत असल्याचा पुरावा दिसत नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने (animal husbandry department) साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra News)

देशात प्राचीन काळापासून गाढव प्राणी हा अवजड ओझं वाहण्याच्या कामासाठी पाळला जायचा, विशेषता कुंभाराकडे सुरुवातीला गाढव निश्चित पाळलं जायचं. सध्या लातूरच्या किल्लारी गावात चक्क गाढवाच्या दुधात आयुर्वेदिक गुणधर्म आहेत अस सांगत दुधाची विक्री केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळालं.

गाढविणीच्या दूधात व्हिटॅमिन डी ची मात्रा अधिक असल्याने रोग प्रतिकारशक्तीही वाढते. या दुधामुळे त्वचा मऊ मुलायम व तजेलदार होते. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनामध्ये गाढविणीच्या दुधाचा वापर केला जातो. गाय, म्हैस व शेळीच्या दुधापेक्षा हे दूध सकस असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आजार बरे हाेतात का ? पशुसंवर्धन विभागाचा दावा

दरम्यान वैज्ञानिक दृष्टीने जुनाट दुर्धर आजार बरे होत असल्याचा पुरावा दिसत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्रीधर शिंदे यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

SCROLL FOR NEXT