पंढरपूर : पंढरीचा विठूराया हा गरिब कष्टकऱ्यांचा देव म्हणून ओळखला जातो. अनेक भाविक दर्शनासाठी शेकडो मैल पायी येतात आणि सावळ्या विठुरायाच्या चरणी लीन होतात. याच विठूरायाच्या गरिब भक्तांमध्ये एक मोठा दानशूर भेटला म्हणायला हरकत नाही कारण मंदिरातील दान पेटीत मुंबईतील एका भाविकांने तब्बल एक कोटी रुपयो दान केले आहेत.Donation of one crore rupees in the donation box in Vitthal temple
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट आल्यापासूनच सर्व देवस्थाने भाविकांनसाठी बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासणाने घेतला आहे तो आजपर्यंत कायम आहे मध्ये काही काळासाठी मंदिर उघडी होती मात्र ती पुन्हा बंद करण्यात आली आहेत.
यामध्ये अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या विठूरायच मंदिरही बंद होत मंदिर बंद असल्याने भाविकांची येण्याचा प्रश्नच येत नव्हता परिणामी मंदिराला येणाऱ्या देणग्यांमध्ये मोठी घट झाली होती .अशातच एका भाविकाने आपल्या लाडक्या विठूरायाच्या चरणी तब्बल एक कोटीची देणगी दिली आहे हे देणगी दिल्याने मंदिर समितीला मोठा आर्थिक आधार मिळाला म्हणायला हरकत नाही.
मुंबई भागात राहणाऱ्या एका विठ्ठल भक्ताने ही देणगी दिली आहे. मंदिर समितीच्या इतिहासामध्ये प्रथमच एका भाविका कडून एक कोटीचे दान मिळाले आहे. मुंबईतील एका विठ्ठल भक्ताचे अलीकडेच कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर या भाविकाला एका इन्शुरन्स कंपनीकडून काही पैसे मिळाले ते आलेले सर्व पैसे या भक्ताच्या कुटुंबीयांनी विठ्ठलाच्या दान पेटीत अर्पण केले. इतकी मोठी रक्कम दान देऊन ही या भाविकांने आपले नाव मात्र गुप्त ठेवण्याची विनंती मंदिर समितीला केली आहे.
Edited By-Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.