Crime samm tv
महाराष्ट्र

Sangli: पहाटे वाद टोकाला, नवऱ्यानं कुऱ्हाड घेतली अन् बायकोच्या डोक्यात हाणली; पती म्हणाला..

Husband Kills Wife with Axe in Domestic Dispute: घरगुती वादातून पतीने पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करत हत्या केली आहे. हत्येनंतर पतीने पोलीस ठाणे गाठत आपल्या गुन्ह्याची कबूली दिली.

Bhagyashree Kamble

सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करत हत्या केली आहे. हत्येनंतर पतीने पोलीस ठाणे गाठत आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

अनिता सीताराम काटकर (वय अंदाजे ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या भाजी विक्रीचा व्यवसाय करत होत्या, आणि त्यांच्यासोबत पतीही काम करत होता. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडणादरम्यान पतीने पत्नीवर हात उगारला. तसेच मारहाणही केली. पतीच्या डोक्यात राग इतका शिरला की त्याने कुऱ्हाड घेतली आणि पत्नीच्या डोक्यात हाणली.

यात अनिताचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांच्या तपासात कौटुंबिक वादातून महिलेची हत्या झाल्याचं समोर आलं. या घटनेनंतर महिलेच्या पतीने पोलिसांसमोर हत्येची कबूली दिली.

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केली असल्याचं त्याने सांगितलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपा युवा नेते राहुल काटकर यांच्या देवपुष्प फाउंडेशनकडून ५१ टन चारा वाटपाचा शुभारंभ

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

SCROLL FOR NEXT