Washim गजानन भोयर
महाराष्ट्र

रमजान सणापूर्वी मुस्लिम कुटुंब उघड्यावर; घरगुती गॅसच्या स्फोटात 3 घरं जळून खाक

आगीच्या भीषणतेमुळे घरातील कोणतीही वस्तू वाचविणे शक्य झाले नाही.

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम : मालेगांव शहरातील गांधीनगर परिसरातील महमूदिया कॉलोनी मध्ये आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत 3 घर जळून पुर्णपणे राख झाल्यामुळे 3 मुस्लिम परीवार उघड्यावर आले आहेत. मालेगांव शहरातील (Malegaon City) गांधीनगर परिसरातील महमूदिया कॉलोनी येथील अताउल्ला खान हिदायत खान यांच्या घराला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली भयंकर उष्णतेमुळे आगीने क्षणातच रौद्र रूप धारण करून शेजारच्या सलीम खान शेरखान खान व शाहिदा बी नूर खान या दोघांच्या घरांना ही कवेत घेतले.

आगीच्या भीषणतेमूळे घरातील कोणतीही वस्तू वाचविणे शक्य झाले नाही, सलीम खान च्या घरातील घरगुती गॅस सिलेंडरचा (Gas cylinder) आगीमूळे स्फोट झाला त्यावेळी तिन्ही घरातील टीन पत्रे हवेत उडाले. मालेगाव यामध्ये सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रमजान महिन्यात येणाऱ्या पवित्र सणाच्या पूर्वी 3 गरीब मुस्लिम परिवारांना आपले सर्वस्व गमावून उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. त्यांना जिल्हा प्रशासनाकडून मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT