Sharad Pawar: आम्ही कधीच भाजपसोबत नव्हतो; शरद पवारांचे स्पष्टीकरण

'महाविकास आघाडी सरकारला कोणताच धोका नाही, आम्ही पुन्हा सत्तेत येणार'
Sharad Pawar
Sharad PawarSaam Tv
Published On

नवी दिल्ली : राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपविरोधात उभी आहे. आम्ही कधीच भाजप सोबत नव्हतो असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार (Narendra Modi and Sharad Pawar) यांची आज संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट झाली या भेटीनंतर ही भेट का झाली याची माहिती खुद्द शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

'भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कोणतीही कटुता नाही, ही कटुता शिवसेनेसोबत (Shivsena) नक्की आहे. जनादेशाचा अवमान सेनेने केला. त्यामुळे सेना-भाजपमध्ये नक्कीच कटुता आहे. पण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सलोख्याचे संबंध आहे.' असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलं होत मात्र आम्ही कधीच भाजपसोबत नव्हतो असं म्हणत पवारांनी मुनगंटीवारांच्या वक्तव्याला उत्तर दिलंय.

हे देखील पहा -

यावेळी बोलतना त्यांनी संजय राऊतांवरील (Sanjay Raut) कारवाईवरती प्रश्न उपस्थित केला. संजय राऊतांवर कारवाई करायची काय गरज होती? असं पवार म्हणाले. तसंच आज आपण पंतप्रधानांशी केवळ १२ आमदाराच्या प्रश्नावर चर्चा केली असून ते विचार करुन निर्णय घेतील असही पवारांनी सांगितलं. मात्र यावेळी नवाब मलिकांवरील कारवाईवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचही सांगायला देखील पवार विसरले नाहीत.

ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपविरोधात उभी आहे. आम्ही कधीच भाजप सोबत नव्हतो असही पवार म्हणाले. शिवाय महाविकास आघाडीला कोणताच धोका नाही आम्ही पुन्हा सत्तेत येणार असा विश्वास देखील पवारांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com