Dombivali MIDC Saam tv
महाराष्ट्र

Dombivali MIDC : डोंबिवली एमआयडीसीत ११० कोटींच्या निधीतून काँक्रीट रस्ते; नवीन रस्त्याची तोडफोड, उद्योजक संतप्त

Dombivali News : रस्त्यांसाठी ११० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तीस वर्षात प्रथमच मंजूर झालेल्या निधीत एमआयडीसी व केडीएमसी यांचा समावेश होता रस्ते पूर्ण होण्याच्या काही महिन्यातच रस्त्यांची तोडफोड

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: डोंबिवली एमआयडीसी फेज १ मधील श्री जी लाईफ स्टाईल कंपनीसमोरच्या नव्याने करण्यात आलेल्या सीमेंट काँक्रीट रस्त्याची अचानक तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकारामुळे स्थानिक रहिवासी आणि उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्यासाठी शासनाने गेल्या तीस वर्षांत पहिल्यांदाच ११० कोटींच्या निधीतून डोंबिवली एमआयडीसीत दर्जेदार रस्त्यांची कामे करण्यात आली. काही दिवसात यांची तोडफोड सुरु झाली आहे. 

डोंबिवली एमआयडीसी परिसरात अनेक वर्षांनंतर चांगले रस्ते झाले होते. शासनाने केडीएमसी व डोंबिवली एमआयडीसी परिसरातील रस्त्यांसाठी ११० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तीस वर्षात प्रथमच मंजूर झालेल्या या निधीत एमआयडीसी व केडीएमसी यांचा समावेश होता. मात्र, रस्ते पूर्ण होण्याच्या अवघ्या काही महिन्यांतच काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यांची तोडफोड करण्यास सुरवात झाली आहे. 

नागरिक, उद्योजक संतप्त 

डोंबिवली एमआयडीसी परिसरात सेवा वाहिन्या, गटारी किंवा इतर कारणांनी रस्त्यांची तोडफोड सुरू झाल्याने खोदकाम सुरु करण्यात आले आहे. याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता दोन दिवसांपासून हा रस्ता फोडण्यास सुरवात झाली आहे. या प्रकारामुळे कधी नव्हे तो चांगला झालेला रस्ता फोडला जात असल्याने नागरिक व एमआयडीसीतील उद्योजकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

कारवाईची होतेय मागणी 

दरम्यान स्थानिकांनी नवीन रस्ता का फोडला जातोय? करदात्यांचा पैसा असा वाया घालवणं बंद व्हावं. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवून चौकशी झाली पाहिजे; अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच केडीएमसी प्रशासन, एमआयडीसी व ठेकेदार यांच्यातील समन्वय अभावामुळे रस्त्यांचा दर्जा आणि कर दात्यांचा पैसा वाया जात असल्याने दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील जोर धरू लागली आहे आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT