Street Dog
Street Dog Saam Tv
महाराष्ट्र

Dombivli News : डोंबिवली ठाकुर्ली परिसरात भटक्या श्वानांची दहशत, संगोपन केंद्रातील श्वानांच्या भुंकण्याने रहिवासी हैराण

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Dombivli News : डोंबिवली जवळील ठाकुर्ली पूर्वेत भर वस्तीत असलेल्या श्वान संगोपन केंद्रातील श्वान सतत भुंकत असल्याने परिरातील सोसायट्यांमधील रहिवासी त्रस्त आहेत. इतकेच नव्हे तर अनेकदा हे श्र्वान आजूबाजूच्या परिसरात फिरत असतात काही जणांना या श्वानांनी चावा घेतल्याच्या देखील घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Maharashtra News)

डोंबिवली ठाकुर्ली मधील शिवमंदिर समोर श्वान संगोपन केंद्र आहे. या केंद्रात जवळपास ६० भटके श्वान ठेवण्यात आले आहेत. यामधील काही श्वान आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. श्वान संगोपन केंद्रातील कुत्र्यांच्या भुंकण्यांचा आवाजाने आजू बाजूच्या सोसायटी मधील नागरिक त्रस्त झालेत.

या श्वान संगोपन केंद्रालगत सोसायटी, तलाव, मंदिर आहे. या परिसरात येणाऱ्या नागरिकांना अनेकदा या श्र्वांनाचा त्रास सहन करावा लागतो. काही नागरिकांना श्वान चावल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. आजुबाजुला कोठेही कुत्री भुंकू लागली की संगोपन केंद्रातील कुत्रीही एकाचवेळी भुंकू लागतात.

त्यामुळे दिवसा ,रात्री अपरात्री श्वानांच्या भुंकण्यांचा त्रास सहन करावा लागतो. याबाबत आमचा विरोध श्र्वानांना नाही मात्र संगोपन केंद्रात दहा वीस श्वान असले ठीक मात्र एकत्रित ५० ते ६० श्वान ठेवण्यात आलेत.

या संस्थेने निर्मनुष्य ठिकाणी स्थलांतरित करावे अशी मागणी सदस्यांनी केली आहे. याबाबत पालिकेकडे तक्रार करुनही या विषयाची दखल घेत नसल्याने दाद मागायची कुठे, असा प्रश्न रहिवाशांसमोर उभा आहे.

याबाबत श्वान संगोपन केंद्र चालकाने नागरिकांना त्रास होत असल्याचे मान्य केले. स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले .मात्र कॅमरसमोर बोलण्यास नकार दिला तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या केंद्राला परवानगी देण्याचा अधिकार कल्याण डोंबिवली पालिकेला नाही. असे केंद्र चालवायचे असेल तर त्यासाठी ठाणे येथील प्राणी आणि निसर्ग संस्थेची परवानगी संबंधित श्वान संगोपन केंद्राला घ्यावी लागते असे सांगितले .

Edited By : Siddharth Lakar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi News: दिल्ली पोलिसांची ७ राज्यात मोठी कारवाई; गोल्डी ब्रार टोळीच्या १० शार्प शूटर्सना अटक

Today's Marathi News Live : नागपूर जिल्हा चौथ्यांदा हादरला, बुधवारी 4 वाजता पुन्हा 2.4 तीव्रतेचे जाणवले भूकंपाचे धक्के

JP Nadda: सात दिवसांत पोलीस ठाण्यात हजर व्हा, जेपी नड्डा यांना कर्नाटक पोलिसांची नोटीस

Name Astrology: z अक्षरापासून सुरू असलेल्या नावाचे लोक कसे असतात?

Rahul Gandhi : नरेंद्र मोदींच्या अदानी-अंबानींवरील विधानावर काँग्रेसचा पलटवार; राहुल गांधींनी थेट Video च शेअर केला

SCROLL FOR NEXT