Dombivli Nandu Joshi case saam tv
महाराष्ट्र

Nandu Joshi case: नंदू जोशी प्रकरणात काँग्रेसची उडी! अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा

Dombivli News: भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांना तत्काळ अटक करा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसकडून पोलिसांना देण्यात आला.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजीत देशमुख, साम टीव्ही

Dombivli Nandu Joshi case : नंदू जोशी प्रकरणात आता काँग्रेसने उडी घेती आहे. काँग्रेसने या प्रकरणातील पिडीतेला पाठिंबा दिला आहे. पिडीतेने नंदू जोशी यांना अटक करण्याचे मागणी करत गेल्या सहा दिवसांपासून मानपाडा पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केलंय.

या ठिकाणी आज काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांच्यासह जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि शिष्टमंडळाने पिडीत महिलेची भेट घेतली. यावेळी या प्रकरणातील भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांना तत्काळ अटक करा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसकडून पोलिसांना देण्यात आला.

यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले म्हणाले, पीडितेनेच्या तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल होतो, यानंतर साधं चौकशीसाठीदेखील आरोपीला बोलावलं गेलं नाही. भाजपमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करतात. तसेच पीडितेला त्याला न्याय देणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले जाते हा कोणता न्याय? असा सवाल भोसले यांनी उपस्थित केला.

तसेच, यावरून भाजपची मानसिकता समजते. या मानसिकतेविरोधात जर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात येईल. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले देखील या आंदोलनात सहभागी होतील असा इशारा यावेळी भोसले यांनी दिला.

भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. यात भाजपचा मोर्चा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवणे, शेखर बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव, त्यापाठोपाठ श्रीकांत शिंदे यांची राजीनाम्याची तयारी यामुळे शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. (Latest Political News)

याशिवाय भाजपकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावर मालमत्ता जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे, तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील शेखर बागडे यांच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यातच आता काँग्रेसने पीडितेला पाठिंबा देत आरोपीला अटक करा अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे. नंदू जोशी प्रकरणावरून कल्याण लोकसभेतील वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

SCROLL FOR NEXT