Dombivli Fire
Dombivli Fire  Facebook
महाराष्ट्र

Dombivli Fire : डोंबिवलीतील पलावा एक्सपेरिया मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Dombivli Fire News : डोंबिवलीतून मोठी बातमी हाती आली आहे. डोंबिवली नजीक असलेल्या पलावा येथील एक्सपेरिया मॉलमध्ये पहिला माळ्यावर आग लागल्याची घटना घडली. रविवारी रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घडली. आग लागल्यामुळे मॉलमध्ये एकच खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे . (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली (Dombivli) नजीक असलेल्या पलावा येथील एक्सपेरिया मॉलमध्ये आग लागल्याची घटना घडली. एक्सपेरिया मॉलच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली आहे. मॉलमधील पहिल्या माळ्यावर असलेला एका कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली. मॉलमध्ये आग (Fire) लागल्यानंतर काही क्षणात आगीने रौद्र रुप धारण केलं. आगीमुळे सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरलं होतं.

रविवार असल्यामुळे रात्री मॉलमध्ये प्रचंड गर्दी होती. अनेक नागरिक मॉलमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी आले होते. मॉलमध्ये सिनेमागृह देखील आहे. अचानक आग लागल्यामुळे लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. आग लागल्याची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तर आग लागल्यानंतर मॉलजवळ बघ्यांची गर्दी देखील जमा झाली होती.

तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. दरम्यान, मॉलमध्ये अडकलेल्या नागरिकांना देखील सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मॉल सारख्या प्रचंड गर्दी असणाऱ्या ठिकाणी आगीच्या घडल्याने अनेकांकडून सवाल केले जात आहे. तसेच मॉलमधील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT