Raigad Accident : कोल्हापूरला दर्शनाला निघाले, पण वाटेतच मृत्युने गाठलं; भीषण अपघातात ३ भाविकांचा जागीच मृत्यू

रायगड जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पेण-खोपोली मार्गावर मोठा अपघात झाला आहे.
Raigad Accident News
Raigad Accident NewsSaam TV

सचिन कदम, साम टीव्ही

Raigad Accident News : रायगड जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पेण-खोपोली मार्गावर मोठा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

Raigad Accident News
Pankaja Munde : अडचणीत सापडलेल्या उद्धव ठाकरेंना पंकजा मुंडेंचा फोन; नेमकी काय चर्चा झाली?

अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विक्रम गोविंद दिंडे (वय ५० वर्ष), नागेश विक्रम दिंडे (वय २६ वर्ष), प्राजक्ता नागेश दिंडे (वय २४ वर्ष) अशी मृतांची नावं असून ते एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे.  (Latest Marathi Update)

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील मृत्युमुखी झालेले कुटुंब कोल्हापूर येथील एका मंदिरात दर्शनाला जात होते. कोल्हापूर येथे बाळूमामाच्या यात्रेसाठी हे कुटुंब कारने निघाले होते. दरम्यान, पेण तालुक्यातील सावरसई येथे ओव्हरटेक करण्याच्या नादात कारने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली.

Raigad Accident News
Sanjay Raut News : खासदार संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल; अटकही होणार? काय आहे प्रकरण?

ही धडक इतकी भीषण (Accident News) होती, की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी नवी मुंबई येथील रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी घटनास्थळी जिल्हा पोलीस उपाधीक्षक अतुल झेंडे यांच्यासह पेण पोलिस घटनास्थळी हजार होऊन अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com