Dombivili News Saam tv
महाराष्ट्र

Dombivili News: ट्रान्सफॉर्मरचे ऑईल अंगावर पडल्‍याने कंत्राटी कर्मचारी भाजला; दुरूस्‍तीचे काम सुरू असताना झाला स्‍फोट

ट्रान्सफॉर्मरचा स्‍फोट होवून ऑईल अंगावर उडाले; केडीएमसीचा कंत्राटी कर्मचारी भाजला

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील पाथरली येथे पाण्याच्या टाकीजवळ ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला. ट्रान्सफरचे काम सुरू असताना केडीएमसीचा (KDMC) कंत्राटी कर्मचारी त्या ठिकाणी उभा होता. अचानक ट्रान्सफरमध्ये स्पोर्ट होवून ट्रान्सफरमधील ऑइल या कर्मचाऱ्यांचा अंगावर पडल्याने (Dombivili) हा कर्मचारी भाजला गेला. अजय म्हात्रे असे कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Tajya Batmya)

डोंबिवली पूर्वेकडील पाथरली परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पाण्याचे टाकी आहे. या ठिकाणी पाणी सोडण्याचे काम महापालिकेचा कंत्राटी कामगार अजय म्हात्रे करतो. आज सकाळी अजय म्हात्रे पाणी सोडण्यास गेला असता लाईट नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने याबाबत तात्काळ महावितरणला माहिती दिली. महावितरणचे (Mahavitaran) अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

दुरूस्‍तीच्‍या कामातच स्‍फोट

ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. अचानक ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट झाल्याने ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल अजयच्या अंगावर पडले. त्यामुळे अजय गंभीर जखमी झाला. अजयवर डोंबिवलीमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

SCROLL FOR NEXT